यांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरीच मिळत नाही, ठाकरेंचा राणेंना टोला

यांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरीच मिळत नाही, ठाकरेंचा राणेंना टोला

Udhav Thackeray On Narayan Rane : मैदाने आता अपुरे पडत आहेत अनेकांना वाटले होते की शिवसेना संपेन, आता शिवसेना सहा पटीने वाढत आहे. अनेकांच्या तर माझ्यावर टीका केल्याशिवाय घशाच्याखाली खास उतरत नाही. तसेच त्यांना माझ्यावर टीका केली नाही तर भाकरीच मिळत नाही. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राणेंवर टीका केली. उद्धव ठाकरे महाडमध्ये शिवगर्जना या जाहीर सभेत बोलत होते.

नेहमी सत्तेकडे सर्वजण जातात. मात्र, आपल्याकडे आज सत्ता नाही. तरीही अनेकजण आपल्याकडे येत आहेत. आज महाडच्या जगताप कुटूंबाने ठाकरे गटात प्रवेश केला. तसेच काही जणांच्या पोटात गोळा आला. की आता यांचे डिपॉजिट जप्त होणार असा टोला ठाकरेंनी महाडचे आमदार भरत गोगावले यांना लगावला.

Sushma Andhare ; एमआयडीसीतून बाप-लेकांनी भंगार विकून खाल्लं

आपला पक्ष आणि चिन्ह चोरून भाजपने हे या गद्दारांना दिले आहे. हे भाजपने खूप नीच असे काम केले. उद्धव ठाकरे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेऊन मैदानात उतरून या गद्दारांशी दोन हात करणार आहे. आता मला कोणाची भीती नाही. महाड म्हणजे शिवसेनेचा आणि आपल्या भगव्याचा आहे. पाहतो आता कुणाची हिंमत आहे भगव्याला कलंक लावण्याची भगव्याला डाग लावणारे हात आता शिवसैनिक मातीत गाडल्या शिवाय राहणार नाही. असा इशारा यावेळी ठाकरेंनी शिंदे गटाला दिला.

पुढे बारसू प्रकल्पाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले बारसूप्रकरणी आपले पत्र दाखवले जात आहे. गद्दारांनी या प्रकरणी मलिदा खाल्ला आहे. यांनी स्थानिकांच्या सोन्यासारख्या जमीनी घेतल्या आहेत. जरी हा प्रकल्प मोठा असला तरी पण तो लोकांच्या हिताचा नसेल तर तो आपल्याला नको अशी भूमिका ही आपली असेल. जरी या प्रकल्पाला माझ्या काळात मंजुरी मिळाली असली तरी परंतु अंतिम मंजुरी शिवाय हा प्रकल्प येणार नाही अशी माझी भूमिका होती हे का नाही सांगत हे गद्दार असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

या सरकारने बारसूच्या जनतेवर अत्याचार करण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस बारसूमध्ये उतरवले आहे. जर या सरकारने एवढा बंदोबस्त चीनच्या सीमेवर लगावला असता तर चीन इकडे आले नसते. जर हा प्रकल्प जनतेच्या हिताचा आहे तर मग तो जनतेला समजून सांगा लाठ्या का चालवताय असा सवाल ठाकरेंनी केला. आणि या सरकारला माझा इशारा आहे की येथील स्थानिकांच्या मदती शिवाय हा प्रकल्प होऊ देणार नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube