Ahmednagar News : ते फिल्मी स्टाईल आले..बस थांबवली..अन् पोरींना घेऊन ते पळाले

Ahmednagar News : ते फिल्मी स्टाईल आले..बस थांबवली..अन् पोरींना घेऊन ते पळाले

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील कायदा व सुव्यवस्था सध्या अक्षरश: धोक्यात आली आहे. दरदिवशी गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच नगरमध्ये अगदी सिनेमाला शोभेल अशी घटना घडली आहे. काही जण दुचाकीवर आले त्यांनी एक चालू बसला रस्त्यातच थांबवले. बसमध्ये बसलेल्या दोन मुलींना मारहाण करत आपल्यासोबत घेऊन गेले. अचानक झालेल्या घटनेनं बसमधील प्रवाशी देखील गोंधळून गेले. ही घटना अहमदनगर पुणे महामार्गावरील केडगाव परिसरातील एका हॉटेल परिसरात घडली आहे.

देशाचा जीडीपी जैन समाजाभोवतीच आहे…; फडणवीसांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होणार?

याबाबत अधिक माहिती अशी, नगर शहरातील पुणे बस स्थानकावरून दोन मुली व एक मुलगा परिवहन मंडळाच्या बसमध्ये बसले होते. बस स्थानकातून निघाली व केडगावच्या दिशेने जात असताना एका हॉटेलच्याजवळ पोहचली असता काही तरुण दुचाकीवरून आले. या दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी थेट फिल्मी स्टाईलमध्ये बसला मोटारसायकल आडवी लावली व बस थांबवली.

महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही; फडणवीसांनी भिडेंना फटकारलं!

त्यानंतर गाडीवरून उतरून तीन तरुण बसमध्ये शिरले. व बसमध्ये बसलेल्या मुलींना मारहाण करत खाली उतरून घेऊन गेले. दरम्यान अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील काही प्रवाशांनी या गोष्टीला विरोध केला मात्र प्रवाशांना त्या तरुणांनी शिवीगाळ केली. काही प्रवाशांनी बस थेट पोलीस ठाण्यात घेऊन जा, असे सांगितले. हे ऐकल्यानंतर त्या तरुणांनी प्रवाशांना हा आमच्या घरातील मॅटर आहे तुम्ही मध्ये पडू नका, असे धमकावले. तसेच जोरजोराने ओरडत तरुण मुलींना बसमधून ओढत घेऊन गेले.

दरम्यान, या मुली कोण होत्या आणि ते तरुण कोण होते? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. ही घटना घडल्यानंतर बस ड्रायव्हरने बस थोड्या अंतरावर घेऊन जात थांबवली होती. मात्र, अशा घटना जर खुलेआम घडत असतील तर खरंच नगर शहरात कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात आहे का? असा सवाल निर्माण होऊ लागला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube