गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट ! मंत्री हसन मुश्रीफांचे चिरंजीव नविद मुश्रीफ पिछाडीवर
Gokul Election Result: महायुतीच्या बारा जागा आघाडीवर आहेत. तर माजी मंत्री बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीच्या आठ जागा आघाडीवर आहे.
Gokul Election Result : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ म्हणजेच गोकुळच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत महायुतीला धक्का बसताना दिसत आहे. महायुतीच्या बारा जागा आघाडीवर आहेत. तर माजी मंत्री बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीच्या आठ जागा आघाडीवर आहे. दोन्ही पॅनेलमधील उमेदवारांमध्ये कमी मतांचा फरक असल्याने या निवडणुकीत काँटे की टक्कर दिसत येत आहेत. (Minister Hasan Mushrif’s Son Navid Mushrif Trails in Vote Count)
महायुतीच्या दोन तगड्या उमेदवारांना धक्का बसताना दिसत आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे हे पिछाडीवर आहेत. तर मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव व माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ हेही पिछाडीवर गेले आहेत. समविचारी आघाडीचे शशिकांत खोत यांनी आघाडी घेतलीय.
राखीव गटात महायुतीला धक्का
राखीव गटात महायुतीला मोठा धक्का बसताना दिसत आहे. केवळ एका महायुतीला आघाडी आहेत. तर समविचारी आघाडीचे चार जण आघाडीवर आहेत. शोमिका महाडिक महायुतीतून, तर अंजना रेडेकर, बयाजी शेळके, माजी आमदार राजू आवळे हे आघाडीवर आहेत.
तिसऱ्या फेरी अखेर महायुतीचे अशोक चरटी, प्रताप पाटील कावणेकर, एस आर पाटील, अमर पाटील, अरुण डोंगळे, कर्णसिंह गायकवाड पिछाडीवर आहेत. तर समविचारी आघाडीचे सर्वसाधारण गटातील शशिकांत पाटील- चुयेकर, विद्याधर गुरुबे, बाबासाहेब चौगले, किसन चौगले, राहुल देसाई, अभिजीत तायशेटे आघाडीवर आहेत.