मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अहमदनगर : लोणी येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या लोणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वसतिगृहाच्या नवीन इमारतीची उत्कृष्टपणे उभारणी केल्याबद्दल विशेष कौतूक केले.

उद्घाटनादरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही वसतिगृहांच्या इमारतींची पाहणी केली‌. यावेळी समाजकल्याण आयुक्त नारनवरे यांनी मुख्यमंत्र्यांना या वसतिगृह इमारतींची वैशिष्ट्ये सांगितली‌ आहेत.

दोनदा अक्षता टाकण्याची पद्धत बंद करा, मराठा समाजाच्या मेळाव्यात ठराव

मागासवर्गीय मुला-मुलींसाठी मौजे हसनापूर शिवारात वसतिगृहाच्या दोन्ही नवीन इमारती उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येकी २ एकर असे ४ एकरांवर ५४ हजार स्क्वेअर फूट बांधकाम करण्यात आले आहे.

Alia Bhatt चे लिव्हिंग रूम फोटो व्हायरल; मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

तळमजल्यासह तीन मजल्यांची सुसज्ज, सुविधायुक्त इमारत बांधण्यात आली आहे. मुलांच्या वसतिगृहासाठी १० कोटी ६५ लाख व मुलींच्या वसतिगृहासाठी १० कोटी ५९ लाख रूपये खर्च करण्यात आला आल्याची माहिती आयुक्त नारनवरे यांनी यावेळी दिली.

गुढीपाडवा, आंबेडकर जयंतीला मिळणार 100 रुपयांत आनंदाचा शिधा

यावेळी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, समाजकल्याण सहायक आयुक्त राधाकिसन देवढे आदी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube