Metro Inauguration : फडणवीस म्हणाले मोदींनी काय जोक सांगितला ते ओळखा…

  • Written By: Published:
Metro Inauguration : फडणवीस म्हणाले मोदींनी काय जोक सांगितला ते ओळखा…

पुणे : मुंबईतील कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मेट्रोतून एकत्रित प्रवास केला. या प्रवासात मोदी, शिंदे व फडणवीस एकाच बेंचवर बसले होते.

यावेळी शिंदे यांच्या बोलण्यावर मोदी, फडणवीस खळाळून हसतानाचे चित्र व्हायरल हाेत आहे. खुद्द फडणवीस यांनी हा फाेटाे ट्विट करत आमच्या काय गप्पा रंगल्या असतील, याचा अंदाज लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र, याप्रसंगी नक्की काय किस्सा झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील मेट्रोसह इतर 38,800 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण केले. यादरम्यान शिंदे व मोदी यांच्यातील केमिस्ट्री पुन्हा दिसून आली. बीकेसीतील मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाला पंतप्रधानांनी दाद दिली.

यावेळी एकनाथ शिंदे भाषण ऐकून मोदींनाही हसू आवरले नाही. पंतप्रधान मोदी यांनी नवीन मेट्रो सेवेचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मेट्रोतून प्रवासही केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube