पाळीव प्राण्यांसाठीही पोटगी द्यावी लागेल; पत्नीपासून वेगळं राहणाऱ्या पतीला कोर्टाचा आदेश

पाळीव प्राण्यांसाठीही पोटगी द्यावी लागेल; पत्नीपासून वेगळं राहणाऱ्या पतीला कोर्टाचा आदेश

मुंबई : घटस्फोटामुळं आर्थिकदृष्ट्या परावलंबी जोडीदाराला रस्त्यावर यायची वेळ येऊ नये, जोडीदाराची हेळसांड होऊ नये म्हणून पोटगी दिली जाते. पोटगी (alimony) मागणं हा कोणत्याही घटस्फोटीत स्त्रीचा अधिकार आहे. दरम्यान, मुंबईच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात (Mumbai Magistrate Court) एका पोटगीच्या खटल्याची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पत्नीकडे असलेल्या पाळीव प्राण्यांच्या खर्चासाठी देखील पोटगी देण्याचा आदेश दिला. महानगर दंडाधिकारी कोमल सिंग यांनी हा निर्णय दिला. (Mumbai Court Orders to husband Alimony for woman with pets animal)

https://www.youtube.com/watch?v=I2f9gQrbQD0

कोर्टाने सांगतिले की, पाळीव प्राणी देखील आपल्या सुसंस्कृत जीवनशैलीचा एक भाग आहेत. तुटलेल्या नातेसंबंधांमुळे निर्माण झालेली भावनिक पोकळी ते भरून काढतात. मनुष्याला निरोगी जीवन जगण्यासाठी पाळीव प्राणी आवश्यक आहेत. त्यामुळं विभक्त झाल्यावर घटस्फोटीत पत्नीकडे दायित्व असलेल्या प्राळीव प्राण्यासाठी पतीने पोटगी द्यावी.

मिळालेल्या माहितीनुसार, एका जोडप्यानं 1986 मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर दोघेही दक्षिण भारतातील एका शहरात राहू लागले. त्यांच्या दोन विवाहित मुली सध्या परदेशात राहतात. गेल्या काही वर्षांपासून या जोडप्यामध्ये काही मतभेद झाले होते, त्यानंतर विभक्त झालेल्या पतीने 2021 मध्ये महिलेला मुंबईला पाठवले.

फोडाफोडी झाली असेल तर आता… रोहित पवारांचा फडणवीसांसह अजितदादांना खोचक सल्ला 

महिलेने सांगितले की, माझ्याकडे उत्पन्नाचे कोणतीही साधना नाही. त्यामुळं पतीने तिला देखभाल आणि इतर मूलभूत गरजा पुरवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्याने हे आश्वासन पूर्ण केले नाही. तिला आरोग्याच्या समस्या आहेत. तिचं वयही बरचं आहे. या व्यतिरिक्त तीन रॉटवेलर कुत्रे देखील तिच्यावर अवलंबून आहेत, म्हणून तिने दरमहा 70,000 रुपये पोटगी मिळावी, अशी मागणी केली.

या प्रकरणात, पतीने दावा केला आहे की आपली कोणतीही चूक नसतांना पत्नीने स्वतःहून घर सोडले. दरमहा मदत करण्याचे आश्वासन मी दिले होते. त्याप्रमाणे मधल्या काळात दरमहा मदत केली होती. मात्र, आता व्यवसायात प्रचंड नुकसान झाल्यानं कोणतीही देखभाल रक्कम देऊ शकत नाही.

दरम्यान, सर्व युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर न्यायदंडाधिकारी म्हणाले की, या याचिकेवर निर्णय देताना महिलेचे वय आणि आजारांचा विचार करणे आवश्यक आहे, तर तिने पाळलेल्या तीन पाळीव प्राण्यांचीही तिच्या जबाबदारी आहे. प्रतिवादीला व्यवसायात नुकसान झाले असले तरी ते त्यांच्या दायित्वातून मुक्त होऊ शकत नाही. त्यामुळं घटस्फोटित महिलेला दरमहा पन्नास हजार रुपये देण्याचे आदेश कोर्टाने दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube