‘राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटांना मिळणार दुप्पट अनुदान’

‘राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटांना मिळणार दुप्पट अनुदान’

पुणे : आता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटांना मिळणार दुप्पट अनुदान मिळणार असल्याची माहिती वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, चित्रपटांच्या अनुदान नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये अ, ब, क, ड अशी वर्गवारी करण्यात आली. यापुढे थीम आधारित चित्रपटांना अनुदान देण्याचा आपण निर्णय करत आहोत.

तसेच शिवाय राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटांना नियमित अनुदानाच्या दुप्पट अनुदान देण्याचा निर्णय आपण घेत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. पुण्यात आज ‘प्रसाद प्रकाशना’चा अमृतमहोत्सवी सांगता समारंभ आणि विविध ग्रंथ प्रकाशन सोहळा पार पडला.

या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मंदिर शास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी उपस्थित होते.

मागील काही वर्षात मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीयस्तरावर पुरस्कार मिळत आहेत. अशा पुरस्कार प्राप्त मराठी सिनेमांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यात येणार असल्याचं मुनगंटीवारांकडून स्पष्ट करण्यात आलंय.

दरम्यान, महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीयस्तरावरील पुरस्कार विजेते चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत आणि या चित्रपट निर्मात्यांनी भविष्यात अधिक चांगल्या सिनेमाची निर्मिती करावी, त्यासाठी प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यामागे आमचा हेतू असल्याचं मुनगंटीवारांनी याआधी सांगितलं होतं.

त्यानुसार आता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटांना मिळणार दुप्पट अनुदान मिळणार असल्याची घोषणा त्यांनी स्पष्ट केलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube