शिवसेना व आमच्यात हो, पण राष्ट्रवादीचा खुला विरोधः प्रकाश आंबेडकर

  • Written By: Published:
शिवसेना व आमच्यात हो, पण राष्ट्रवादीचा खुला विरोधः प्रकाश आंबेडकर

मुंबईः येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना व आमच्यात एकत्र येण्याबाबत चर्चा होत आहे. शिवसेनेला वंचितबरोबर आघाडी करायची आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी यांना शिवसेनेला एकत्र घ्यायचे आहे. पण राष्ट्रवादीचा आम्हाला खुला विरोध आहे. तर काँग्रेसचा छुपा विरोध आहे. गरीब मराठा सत्तेमध्ये येऊ नये, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचा आरोपही वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

आंबेडकर म्हणाले, आम्हाला पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेस केवळ बोलून दाखवत आहे. पण कृती करत नाही. २०१९ च्या निवडणुकीतील बारा लोकसभा जागा मागितल्या होत्या. त्यातील पाच लोकसभा जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सातत्याने पराभूत झाली आहे. त्यानंतर विधानसभेच्या जागांबाबत भांडणार होतो. आता महानगरपालिका निवडणुका आहे. त्याबाबत आमच्यात व शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी शिवसेनेला आपल्याबरोबर घेते का हा दोघांमध्ये तिढा असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

शिवसेनेबरोबर होणाऱ्या आघाडीबाबत आंबेडकर म्हणाले, आमच्यामधील बैठका संपल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेत स्वतंत्र्य लढण्याची तयारी केली होती. ८३ जागांवर आमची तयारी आहे. आता शिवसेनेबरोबर आघाडी झाल्यावर शिवसेना जेवढे जागा सोडतील, तेवढ्या जागा आम्ही लढू. पण ज्या ठिकाणी सेनेची ताकद कमी आहेत. त्या जागा काँग्रेस मागत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube