Sanjay Raut : “साहेब, मी गद्दार नाही…” सामनाच्या पहिल्या पानावर संजय राऊत यांची जाहिरात
उद्या दि. २३ जानेवारी हा बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असतो. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्याकडून ‘साहेब मी गद्दार नाही’ अशी एक जाहिरात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मध्ये प्रकाशित केली आहे. यानिमित्ताने संजय राऊतांनी बाळासाहेबांना अभिवादन केलंय. या निमित्ताने संजय राऊतांनी एक निर्धारही व्यक्त केलाय.
काय आहे या जाहिरातीमध्ये?
बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करताना या जाहिरातीमध्ये म्हटलं लिहल की, ‘साहेब मी गद्दार नाही. गेलेल्या 40 गद्दारांना गाडून पुन्हा त्याच उमेदीने उभे राहू, तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केलं याचं समाधान आमच्यासारख्या शिवसैनिकांना होईल. जय हिंद… जय महाराष्ट्र.’
बाळासाहेब ठाकरे यांना खासदार संजय राऊतांनी अभिवादन केलं आहे. सामना वर्तमान पत्राच्या पहिल्या पानावर जाहिरात प्रसिद्ध झाली असून, त्यावर खासदार संजय राऊत यांच्याबरोबरच विक्रोळीचे ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांचंही नाव आहे. 40 बंडखोर आमदारांना पराभूत करण्याचा निर्धारही राऊतांनी व्यक्त केलाय.