Shantabai Kamble : मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्र लेखिकेचे निधन 

Shantabai Kamble : मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्र लेखिकेचे निधन 

पुणे : “माझं जल्माचं गाव महुद बुद्रुक, गाव कराड-पंढरपूर रस्त्यावर हाय, गावाच्या आजूबाजूला मळ हायत, कासाळ वडा नदीसारखा हाय, अशी प्रभावी बोली भाषा, माणदेशी भाषा “माझ्या जलमाची चित्तरकथा” या मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्र आपल्या आत्मकथनातून जागोजागी पेरणाऱ्या शांताबाई कृष्णाजी कांबळे (वय १०१) बुधवार (दि. २५) यांचे निधन झाले.

शांताबाई कांबळे यांच्या याच आत्मकथनातून “नाजूका” ही चित्रमालिका मुंबई दूरदर्शनवर झळकली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभलेल्या शांताबाई कांबळे यांचा बराच काळ जत तालुक्यात, आटपाडी तालुक्यतील करगणी, दिघांची गावात शिक्षिका, विस्तार अधिकारी म्हणून गेला.  ‘माझ्या जलमाची चित्तरकथा’ या आत्मकथनातून त्यांनी १९३० ते १९५० या काळातील तत्कालीन जीवन आपल्या लेखणीतून रेखाटले, गावगाडा, देव देवरूषी, ढोर फाडी, पंढरपुरच्या विठोबाला जाऊनही त्यांना देवदर्शन न मिळणे वगैरे त्या काळात दलितांना गावगाड्यात काय वागणूक दिली जात होती याचे वर्णन या आत्मकथनात पाहायला मिळते.

“माझ्या जलमाची चित्तरकथा” या आत्मकथनाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन व्ही. पी. सिंग यांच्या हस्ते शनिवार वाड्यावर पार पडले होते. त्या आपल्या आत्मकथनातून अनेक अनुभव चितारताना दिसत. ‘बैलांनी खाल्लेली ज्वारी… शेणातून जशीच्या तशी बाहेर पडलेली ज्वारी धुवून परत ती दळून आणून खाल्लेला’ प्रसंग वर्णन केलेला आहे. बाबासाहेब आणि त्यांच्या विचारांची छाप त्यांच्यावर होती, समाजावर होती, करगणी आणि आजूबाजूच्या सात गावांमधील  तत्कालीन महार समाजाने १९५७ साली केलेले बौद्ध धर्मातील धर्मांतर आणि त्यानंतर गावाने टाकलेला बहिष्कार त्यांनी वर्णन केला आहे.

शांताबाई कांबळे यांचे हे आत्मकथन दलित स्रियांच्या आत्मकथनामध्ये पहिले होते. जमले तसे लिहिले अशी त्यांची प्रांजळ भूमिका होती. दलित स्त्रीचे पाहिले आत्मकथन लिहीत असताना दलित स्त्रीच्या वाट्याचे दुःख, उपेक्षा अवहेलना, वैयक्तिक अनुभवाबरोबरच सामाजिक अनुभव त्यांनी चित्रित केले आहेत, अशी शांताबाई कांबळे यांच्याविषयची भावना शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी व्यक्ती केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube