Gaming Bill : ऑनलाईन गेमिंग विधेयक संसदेत मंजूर; ड्रीम-11 ॲपने घेतला मोठा निर्णय

Gaming Bill : ऑनलाईन गेमिंग विधेयक संसदेत मंजूर; ड्रीम-11 ॲपने घेतला मोठा निर्णय

Online Gaming Bill : संसदेत नुकतेच ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर करण्यात आलं. (Bill) या विधेयकात ऑनलाईन गेमिंगसंदर्भात महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ऑनलाईन पैसे कमवण्याची संधी देणाऱ्या गेम्सबाबत सरकारने आपले धोरण कठोर केले आहे. तशा काही तरतुदी या विधेयकात आहेत. दरम्यान, हे विधेयक संसदेत मंजूर होताच ड्रीम-11 ॲपने मोठा निर्णय घेतला आहे. या ॲपच्या मूळ कंपनीने या अॅपमधील सर्व पैसे काढून घ्या, असं आवाहन या कंपनीने केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पे टू प्ले हा ऑप्शन रद्द केला आहे. तसेच हे ॲप वापरणाऱ्या सर्वानीचा आपापले पैसे काढून घ्यावेत, असे आवाहनही कंपनीने केले आहे. दरम्यान, आता या कंपनीच्या या निर्णयानंतर ड्रीम-11 ॲप वापरणाऱ्या सर्वांनाच आपापले पैसे काढून घ्यावे लागणार आहेत. संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर ड्रीम-11 ॲपच्या कंपनीने हे अॅप वापरणाऱ्यांना एक आवाहन केले आहे.

गेमिंगचा भुलभुलैया; ऑनलाईन गेम्सच्या नादात होतेय कोटींची उधळण

आम्ही आता ‘पे टू प्ले’ हा पर्याय थांबवत आहोत. फॅन्टॅसी स्पोर्ट्स कॉन्टेस्ट प्लॅटफॉर्ममध्ये हा ऑप्शन असायचा. आता हा ऑप्शन उपलब्ध नसेल, असे कंपनीने सांगितले आहे. तसेच तुमच्या खात्यातील पैसे कुठेही जाणार नाहीत. ते सुरक्षित आहेत. तसेच तुम्हाला ड्रीम-11 ॲपमधून ते काढून घेता येतील, असेही या कंपनीने सांगितले आहे. संसदेत मंजूर करण्यात आलेल्या या विधेयकाचे नाव ऑनलाईन गेम प्रचार आणि नियमन विधेयक 2025 असे आहे.

या विधेयकाच्या माध्यमातून सरकारने रियल मनी गेम्सवर थेट बंदी घातली आहे. लोकसभा आणि राज्यसभेत अवघ्या 72 तासांत हे विधेयक मंजूर करण्यात आले. आता दोन्ही सभागृहांच्या मंजुरीनंतर हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवले जाईल. सराकरच्या या विधेयकानंतर आता पे टू प्ले ऑप्शन देणाऱ्या ड्रीम-11, एमपीएल, पोकरबाजी अशा अॅप्सना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube