गेमिंगचा भुलभुलैया; ऑनलाईन गेम्सच्या नादात होतेय कोटींची उधळण

गेमिंगचा भुलभुलैया; ऑनलाईन गेम्सच्या नादात होतेय कोटींची उधळण

online gaming people are losing 20000 crores every year in gaming says data : ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यातून 45 कोटींहून अधिक लोकांना वाचवण्यासाठी, ‘ऑनलाइन गेमिंग विधेयक’ 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर एका अधिकृत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. सरकारकडील एका आकडेवारीनुसार, दरवर्षी सुमारे 45 कोटी लोक ‘ऑनलाइन रिअल मनी गेमिंग’मध्ये सुमारे 20 हजार कोटी रुपये गमावत आहेत.

मोठी बातमी! पाकिस्तानकडून अनेक हवाई मार्ग बंद, धक्कादायक कारण…

ऑनलाईन गेमिंगच्या सवयीमुळे लोकांचे केवळ पैशांचेच नुकसान होत नाही तर हे खेळ आता समाजासाठी एक मोठीच समस्या बनत आहेत. सरकारने या खेळावरील बंदीमुळे होणाऱ्या महसुलाच्या नुकसानीपेक्षा लोकांच्या कल्याणाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर ऑनलाइन गेमिंगच्या नियमनाचे विधेयक सादर केले गेेले आणि त्यानंतर ते लोकसभेत मंजूर झाले. ऑनलाइन गेमिंग विधेयक 2025 सादर करण्याचा उद्देश बेटिंग आणि ऑनलाइन चालणाऱ्या पैशाच्या खेळांवर बंदी घालून ई-स्पोर्ट्स आणि ऑनलाइन सोशल गेमिंगला प्रोत्साहन देणे आहे.

रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला थेट क्रीडामंत्र्यांचा फोन, महाराष्ट्राची हिरकणी संबोधत केला गौरव

नियम मोडणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

विधेयकानुसार, पैशांच्या खेळात सहभागी असलेल्या कंपन्यांवर प्रामुख्याने राज्य सरकारे कारवाई करतील. जर एखादी कंपनी विधेयकाच्या विरोधात गेली आणि ऑनलाइन मनी गेमिंगची सेवा देत असेल, तर उल्लंघन करणाऱ्याला 1 कोटी रुपये दंड किंवा तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जाहिरातदारांना दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा 50 लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. सरकार गेल्या साडेतीन वर्षांपासून या खेळाच्या प्रकाराला नियमित करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु रिअल मनी गेमिंग करणारे खेळाडू याकडे दुर्लक्ष करत होते. परंतु लोकांच्या तक्रारी आल्यानंतर विधेयकातील तरतुदींचा मसुदा तयार करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube