त्या लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असता तर… नदीत दूध टाकणाऱ्यांना न्याय‍ाधीश ओक यांनी फटकारले

Justice AS Oka यांनी वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव आणि पर्यावरणाचं नुकसान झाल्याचं म्हणत नदीत दूध टाकणाऱ्यांना फटकारले

Justice AS Oka

Justice AS Oka Criticize People who Milk Poured Into River : गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील सिहोर जिह्यामध्ये शिव पुराण कथेच्या सांगतेवेळी नर्मदा नदीमध्ये धार्मिक विधींचा भाग म्हणून 11 हजार लीटर दूध ओतण्यात आले. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. त्यावर आता न्यायमुर्ती अभय ओक यांनी वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव आणि पर्यावरणाचं नुकसान झाल्याचं म्हणत नदीत दूध टाकणाऱ्यांना फटकारले ते चेन्नईमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.

नेमकं प्रकरण काय?

मध्य प्रदेशातील सिहोर जिह्यामध्ये शिव पुराण कथेच्या सांगतेवेळी नर्मदा नदीमध्ये धार्मिक विधींचा भाग म्हणून 11 हजार लीटर दूध ओतण्यात आले. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. यावर सोशल मिडीयावर देखील विविध टीकात्मक प्रतिक्रिया आल्या. पर्यावरणाचं नुकसान तसेच दूध जे लोकांमध्ये वाटलं असतं तर अनेक गोर गरीबांची भूक भागली असती. अशा काही प्रतिक्रिया या दूध नदीच्या टाकण्याच्या प्रकारावर आल्या. त्यावर आता न्यायमुर्ती अभय ओक यांनी वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव आणि पर्यावरणाचं नुकसान झाल्याचं म्हणत नदीत दूध टाकणाऱ्यांना फटकारले. ते चेन्नईमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनावर भर देण्याची गरज असल्याचं बोलून दाखवलं.

काय म्हणाले न्यायमुर्ती अभय ओक?

धर्माच्या नावाखाली आपण पर्यावरणाचं नुकसान करत आहोत. त्यामुळे आपण जर वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित केला तर हे प्रकार कमी होती. तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे म्हणजे आपण काही धर्म आणि श्रद्धेच्या विरोधात आहोत असा होत नाही. यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मध्य प्रदेशातील सिहोर जिह्यामध्ये शिव पुराण कथेच्या सांगतेवेळी नर्मदा नदीमध्ये धार्मिक विधींचा भाग म्हणून 11 हजार लीटर दूध ओतण्यात आले.मात्र यामुळे पाण्याचे प्रदुषण होते.

पहिल्यांदाच रितेश विलासराव देशमुख, अभिषेक बच्चन आणि जिनिलिया देशमुख बिग बॉसच्या मंचावर एकत्र

याबद्दल साधे गुगलवर सर्च केले तरी देखील नदीमध्ये दूध टाकण्याचे दुष्परिणाम वाचयला मिळतील. दूध पाण्यात टाकल्याने ते पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेते. त्यामुळे पाण्यातील जीवाना मोठे नुकसान होऊ शकते. मात्र या लोकांना जर वैज्ञानिक दृष्टीकोन असता तर त्यांनी असे केले नसते. त्यामुळे आपण कोणतीही धार्मिक गोष्ट करताना ती पर्यावरणाला नुकसान पोहचवणारी नाहीय ना? याची खात्री करावी असं म्हणत न्यायमुर्ती अभय ओक यांनी नदीत दूध टाकणाऱ्यांना फटकारले.

follow us