महिला आरक्षणाबाबत मोठी अपडेट! 2023 ची घटनादुरूस्ती लागू, कायदा मंत्रालयाकडून नोटीफिकेशन जारी
women's reservation अधिवेशनाला दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महिला आरक्षणासंदर्भातील घटना दुरुस्ती लागू करण्यात आली आहे.
Big update on women’s reservation! Constitutional Amendment Act 2023 comes into effect, notification issued by Law Ministry : महिला आरक्षण लागू करण्यासाठी गुरूवारी संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. हे अधिवेशन उद्या पर्यंत चालणार असून 2029 च्या लोकसभा निवडणुकांपासून महिला आरक्षण लागू करण्याच्या उद्देशाने सरकारने महत्वाचे विधेयक मांडले आहे. त्यावर आज शुक्रवारी दुपारी 4 वाजता मतदान पार पडणार आहे. मात्र या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महिला आरक्षणासंदर्भातील घटना दुरुस्ती गुरुवारपासूनच लागू करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय कायदा मंत्रालयाने नोटिफिकेशन जाहीर केलं आहे.
या दरम्यानच 2023 मध्ये पारित करण्यात आलेली घटना दुरुस्ती गुरुवारपासूनच लागू करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय कायदा मंत्रालयाने नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारला सध्या प्रस्तावित घटना दुरुस्ती संमत करून घेता आले नाही. तरीही यापूर्वी संमत केलेल्या महिला आरक्षण घटना दुरुस्ती कायदा लागू करण्यात आलाय. फक्त त्यासाठी 2019 च्या लोकसभेत 33 टक्के महिला आरक्षणाचे अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारला 2019 आधी ही जनगणना पूर्ण करावी लागेल. त्याचबरोबर हे महिला आरक्षण 2011 च्या जनगणनेनुसार लागू होणार की की नव्या जनगणनेनुसार हे संसदेतील आज आणि उद्याच्या चर्चेवर अवलंबून असेल.
महिला आरक्षण विधेयकाच्या बाबतीत सरकार ‘करा किंवा मरा’ अशा स्थितीत असल्याचं दिसत आहे. (Loksabha) काँग्रेससह विरोधी पक्ष या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मैदानात आहेत. सरकारने गुरुवारी (दि. 16 एप्रिल)रोजी लोकसभेत नियम 66 निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याचा उद्देश महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयके एकाच वेळी मंजूर करून घेणं हा आहे.