नागालँडसह त्रिपुरामध्ये फुललं कमळ

नागालँडसह त्रिपुरामध्ये फुललं कमळ

नवी दिल्ली : मेघालय (Meghalaya), त्रिपुरा (Tripura)आणि नागालँडच्या (Nagaland)सत्तेवर पुढील पाच वर्षे कोणाची सत्ता राहणार? याचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय. नागालँडमध्ये भाजपनं(BJP) बहुमताचा आकडा ओलांडलाय, तर त्रिपुरामध्येही भाजप सरकार स्थापन करताना दिसतंय. मात्र, मेघालयात त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे. येथे कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळताना दिसत नाही.

त्याचबरोबर नागालँड विधासनभा निवडणुकीत पहिल्यांदा एक महिला उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. एनडीपीपीच्या उमेदवार हेकानी जाखलू या दिमापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांनी लोक जनशक्ती पार्टीच्या उमेदवार पराभव केलाय.त्याचबरोबर नागालँडमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय (आठवले) पक्षानं दोन जागा जिंकल्याचं पाहायला मिळतंय.

`Pune BJP म्हणजे मोहोळ, मुळीक, बीडकर आणि रासने हे काही योग्य नाही`

60 पैकी 33 जागांवर भाजप आघाडीवर असल्यानं आगरतळा येथील मुख्यमंत्री माणिक साहा यांच्या निवासस्थानी मिठाईचं वाटप करण्यात येतंय. त्रिपुरातील भाजपनं पुन्हा 31 जागांसह बहुमताचा आकडा पार केलाय.नागालँडमध्ये 36 जागांवर भाजप आघाडीवर आहे. त्यामुळं आता नागालँंडमध्ये भाजपचीच सत्ता येणार असल्याचं स्पष्ट झालंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube