Electricity rates : केंद्र सरकार विजेच्या दरांमध्ये (Electricity rates) बदल करण्याबाबत नवीन नियम करण्याच्या विचारात आहे. ऊर्जा मंत्रालयाने शुक्रवारी माहिती देतांना सांगितले की, येत्या काही दिवसांत भारतातील नवीन वीज नियमांनुसार, (new electricity norms) दिवसा वीज वापरल्यास कमी बिल आकारलं जाणार आहे. दिवसा आणि रात्रीच्या विजदरांमध्ये मोठा फरक असणार आहे. म्हणजे, सकाळी होणाऱ्या विजपुरवठ्यासाठी आकारला जाणारा वीजदर हा 20% कमी असेल. तर हाच वीजदर रात्रीच्या वेळी 20% अधिक असेल. असे नवे दर लागू करण्यासाठी वीज मंत्रालयाकूडन कंपन्याना परवानगी दिली जाणार आहे. मंत्रालयाने सांगितले की, या नावीन्यपूर्ण उर्जेचा वापर वाढवणे हा या निर्णयामागचा हेतू आहे. (Cheap electricity during the day, expensive at night! Modi government’s big decision)
या व्यवस्थेमुळे ज्या वेळी विजेची मागणी जास्त असेल, तेव्हा ग्रिडवरील मागणी कमी होईल, अशी अपेक्षा आहे. अनेक भारतीय कुटुंबामध्ये काम आटोपल्यानंतर रात्री एसीचा वापर सुरू होतो, त्यावेळी विजेची मागणी या निर्णयामुळे कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
गड्या आपला गावच बरा! सुट्टीवर आलेले मुख्यमंत्री शिंदे पत्नीसह रमले शेत-शिवारात…
हा नियम एप्रिल 2024 पासून व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी आणि एका वर्षानंतर कृषी क्षेत्र वगळता इतर बहुतांश ग्राहकांसाठी लागू होईल. केंद्रीय ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी सांगितले की, सौर ऊर्जा स्वस्त असल्याने दिवसाच्या वेळी वीजेचा वापर कमी केल्यास कमी पैसे आकारले जातील. त्यामुळे ग्राहकांना याचा लाभ मिळेल. तर रात्रीच्या वेळी औष्णिक, जलविद्युत आणि गॅसवर आधारित क्षमतेचा वापर होतो. त्याचा खर्च सौरऊर्जेच्या तुलनेत अधिक असतो. तो खर्च वीजबिलात दिसून येईल.
या निर्णयामुळे भारताला 2030 पर्यंत गैर-जीवाश्म इंधनांपासून आपल्या ऊर्जा क्षमतेच्या 65 टक्के आणि 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन मिळवण्याच्या दृष्टीने मदत मिळण्याची अपेक्षा आहे.