गड्या आपला गावच बरा! सुट्टीवर आलेले मुख्यमंत्री शिंदे पत्नीसह रमले शेत-शिवारात…

गड्या आपला गावच बरा! सुट्टीवर आलेले मुख्यमंत्री शिंदे पत्नीसह रमले शेत-शिवारात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या सुट्टीवर मूळगावी साताऱ्याला आले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंचं मुळगाव असलेल्या महाबळेश्वर येथील दरे गावात ते मुक्कामी आहेत. यादरम्यान त्यांनी शेताची पाहणी करत आढावा घेतलाय. यावेळी स्वतः मिसेस मुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांनी शेतामध्ये लागवड करत काम केलं आहे.

या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनाही आपल्या गावचा किती ओढा आहे याची प्रचिती आलीय. गावात येताच त्यांनी ग्रामदैवतांचे दर्शन घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी गावातील ग्रामस्थांचे प्रश्नही सोडवले आहेत. गावकऱ्यांसाठी त्यांनी जनता दरबार भरवत प्रश्न ऐकून घेतले आहेत. एवढंच नाहीतर गावच्या संरपंचासारखं प्रत्येक प्रश्न सोडवल्याचं पाहायला मिळाले आहेत. यासोबतच आपल्या शेतात कामही केलं आहे.

पाटण्यातून उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल, ‘हुकूमशाहीच्या विरोधात लढू’

एकीकडे सत्तासंघर्ष आणि राजकीय घमासान सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्राऊंड फिल्डवर काम करीत आहेत. अशातच मुख्यमंत्री शिंदे पत्नीसह शेतात रमल्याचं दिसून आले आहेत.

तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान काँग्रेस जिंकणारच; विरोधकांच्या बैठकीआधीच राहुल गांधींचा एल्गार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी मूळगावी दरे इथं मुक्कामी आले आहेत. आपल्या स्वत:च्या शेताची पाहणी करुन त्यांनी पिकाची मशागतही केली आहे. यावेळी त्यांनी शेतात रोपांची आणि केळीची लागवड केली आहे.

Sonali Kulkarni: दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलालसोबत मराठी कलाकार करणार काम

यादरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी साताऱ्य़ातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पर्यटनाच्या वाढीसाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील, याबाबत चर्चा केली आहे. याचवेळी मुख्यमंत्री शिंदेंनी शासन आपल्या दारी उपक्रम राबवून जलशिवार योजनेसाठी कोयना सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

दुपारी शेतातील कामे आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रिक बग्गीमधून गावात फेरफटका मारत ग्रामस्थांशी संवाद साधला. आज मुख्यमंत्र्यांच्या गावच्या परिसरात पूर्ण सूर्य प्रकाश असल्याने रोजच्या दगदगीतून गावी आल्याने मुख्यमंत्री आनंदी आणि उत्साही दिसत होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube