लाल किल्ला स्फोटप्रकरण: 245 दिवसांनंतर मृतांवर होणार अंत्यसंस्कार; न्यायालयाची परवानगी

दिल्ली लाल किल्ल्याजवळील कार बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या 11 जणांवर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

  • Written By: Published:
Bomb Blast

Delhi Red Fort Bomb Blast Case: दिल्ली न्यायालयाने सोमवारी ‘राष्ट्रीय तपास संस्थे’ला (NIA) गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या लाल किल्ल्याजवळील कार बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या 11 जणांवर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिली आहे. तसेच विशेष न्यायाधीश पितांबर दत्त यांनी या आत्मघातकी स्फोटात सहभागी असलेला कार चालक डॉ. उमर-उन-नबी याच्या शरीराचे अवशेष दफन करण्याची परवानगीही दिली.

पुनित बालन समूहाची इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या तिसऱ्या हंगामात दमदार एन्ट्री

पीडितांच्या धार्मिक भावनांचा विचार करून पूर्ण सन्मानाने हे अवशेष विल्हेवाट लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच, यासंदर्भात एनआयएकडून अंमलबजावणीचा अहवालही न्यायालयाने मागवला.

यूपीतील आणखी एका शहराचे नाव बदलले ; जलालाबाद आता भगवान परशुरामपुरी

एनआयएने न्यायालयाला सांगितले की, पीडित आणि आत्मघातकी हल्लेखोर नबी याच्या शरीराच्या अवशेषांमधून फॉरेन्सिक पुरावे यापूर्वीच गोळा करण्यात आले आहेत. हे अवशेष कुजण्यास सुरुवात झाल्यामुळे त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी संस्थेने याआधीच न्यायालयाची परवानगी मागितली होती. या स्फोटाप्रकरणी एनआयएने 7,500 पानांचे आरोपपत्र दाखल केले. गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी राजधानीला हादरवून सोडणाऱ्या आयईडी (IED) स्फोटाबाबत एनआयएने 14 मे रोजी 7,500 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.

सोनम वांगचुग सारख्या व्यक्ती जाणं हेच सरकारला हवं; उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

गेल्या महिन्यात, एनआयएने या स्फोटात सहभाग असलेल्या आणखी तीन आरोपींविरुद्ध पूरक आरोपपत्र दाखल केले. यामध्ये एका फरार बालरोगतज्ज्ञाचा समावेश आहे, ज्याची ओळख एका दहशतवादी गटाचा संस्थापक सदस्य म्हणून पटली आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रांमध्ये नमूद केलेल्या व्यक्तींची एकूण संख्या आता डॉ. उमर-उन-नबी याच्यासह 13 वर पोहोचली आहे.

follow us