CJP नंतर आता राजकारणात ‘इश्क’चा तडका; माजी न्यायमूर्ती काटजूंकडून ‘इश्क करो पार्टी’ ची घोषणा

Ishq Karo Party मार्कंडेय काटजू यांचा कायदेशीर आणि सार्वजनिक जीवनप्रवास थक्क करणारा आहे. ते 2006 मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाले आणि...

  • Written By: Published:
Markandey Katju launches Ishq Karo Party

Markandey Katju launches Ishq Karo Party : आपल्या बेधडक विधानांसाठी आणि सोशल मीडियावरील सक्रियतेसाठी प्रसिद्ध असलेले सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी कोणत्याही कायदेशीर मुद्द्यावर नव्हे, तर ‘इश्क करो पार्टी’ नावाच्या एका नव्या राजकीय उपक्रमाची घोषणा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमकी ही पार्टी काय? त्याचा मूळ उद्देश काय? याबद्दल जाणून घेऊया…

पाकिस्तान संघाच्या पराभवाने मी दु:खी; सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू पुन्हा बरळले

‘मेक लव्ह नॉट वॉर’ हा मूळ संदेश

न्यायमूर्ती काटजू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वरून या नव्या पक्षाची घोषणा केली. त्यांनी स्वतःला या पक्षाचे संरक्षक घोषित केले असून तरुणांना या पक्षात सामील होण्याचे आवाहन केले आहे. “मेक लव्ह नॉट वॉर” (प्रेम करा, युद्ध नको) हा या पक्षाचा मुख्य उद्देश आहे. सध्याच्या द्वेष आणि संघर्षाच्या राजकारणात प्रेम, बंधुभाव आणि मानवी संबंधांना चालना देणे हे या पक्षाचे उद्दिष्ट असल्याचे काटजू यांनी म्हटले आहे.

‘कॉकरोच जनता पार्टी’शी तुलना

काटजू यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर चर्चा आणि थट्टा-मस्करीला उधाण आले आहे. अनेक नेटकरी या पक्षाची तुलना अलीकडेच चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’शी म्हणजेच CJP शी करत आहेत. सीजेपीने पेपर लीक प्रकरणावरून जंतर-मंतरवर आंदोलन केले होते. यावर काटजू यांनी उपरोधिक टिप्पणी करत तरुणांना उद्देशून “कॉकरोचसारख्या निरर्थक गोष्टी विसरा आणि ‘इश्क करो पार्टी’मध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे.

मला डोळे मारणाऱ्या सर्व महिला वकिलांना अनुकूल आदेश मिळाले; SC चे माजी न्यायमूर्ती काटजूंची पोस्ट

काटजू यांनी सुरू केलेल्या ‘इश्क करो पार्टी’चा प्रभाव केवळ सोशल मीडियापुरताच मर्यादित असल्याचे दिसत असून,  या पक्षाची कोणतीही अधिकृत संघटनात्मक रचना, निवडणूक योजना किंवा जाहीरनामा अद्याप जाहीर झालेला नाही. काटजू यांच्या नव्या पार्टीवर यूजर्सने दणक्यात प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना तणावपूर्ण राजकीय वातावरणात एक सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले आहे तर, अनेकांनी हे केवळ एक उपरोधपूर्ण आणि विनोदी पाऊल वाटत आहे. एका यूजरने “एकतर्फी प्रेम करणारे लोकही या पक्षात सामील होऊ शकतात का?” असा मजेशीर प्रश्न विचारला आहे.

डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी बाजारात आलं ‘USB कंडोम’; मोबाईल चार्ज करताना नक्की काय होणार?

मार्कंडेय काटजू कोण आहेत?

मार्कंडेय काटजू यांचा कायदेशीर आणि सार्वजनिक जीवनप्रवास थक्क करणारा आहे. ते 2006 मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाले आणि 2011 मध्ये निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. अलाहाबाद, मद्रास आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी सेवा बजावली आहे. निवृत्तीनंतरही ते सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपली परखड मते मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यानंतर आता काटजू यांनी ‘इश्क करो पार्टी’ ची सुरूवात केली आहे. त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम खरोखरच भविष्यातील एक गंभीर राजकीय पाऊल आहे की, केवळ सोशल मीडियावरील चर्चेसाठी केलेली एक कोटी? हे येणारा काळच ठरवेल. मात्र, न्यायमूर्ती काटजू यांनी आपल्या या अनोख्या पुढाकाराने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

follow us