मोदींच्या दहा रुपयांच्या झालमुरीमुळे जिल्ह्याचा निकाल फिरला ! झाडग्राममधील चारही जागा भाजपकडे

Narendra Modi-. तर एका ठिकाणी त्यांनी झालमुरी (भेळ) खाली होती. त्या ठिकाणचे मतदार हे नरेंद्र मोदींच्या प्रेमात पडले आहेत.

West Bangel Result

West Bengal Result 2026: आताच्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजपला (BJP) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee) या मतदारांनी जोरदार झटका दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचार करत ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार प्रहार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगालमधील अनेक मंदिरात गेले होते. तर एका ठिकाणी त्यांनी झालमुरी (भेळ) खाली होती. त्या ठिकाणचे मतदार हे नरेंद्र मोदींच्या प्रेमात पडले असून, झाडग्राम जिल्ह्यातील चारही मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराने विजयाकडे वाटचाल केली आहे. या जिल्ह्यात टीएमसीला मोठा धक्का बसला आहे.

आतापर्यंतच्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. झाडग्राम, बिनपूर, गोपीबल्लभपूर, नयाग्राम या चार विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल केली आहे. झाडग्राम विधानसभा मतदारसंघात भाजपचे लक्ष्मी कांत सो हे आघाडीवर आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी टीएमसीचे उमेदवार मंगल सोरेन यांना पिछाडीवर टाकले आहे. झाडग्राम शहरात सुरुवातीपासून भाजपचा उमेदवार लीडवर होता. तर बिनपूर विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी राखीव जागा आहेत. या ठिकाणी भाजपचे उमेदवार प्रनत टुडू हे आघाडीवर आहेत. त्यांनी टीएमसीचे मोठे नेते बिरबाहा हाँसदा यांना पिछाडीवर टाकले आहे. बिरबाहा हे पिछाडीवर जाणे हे टीएमसीसाठी मोठा धक्का आहे.

गोपीबल्लभूर विधानसभा मतदारसंघात ‘महता’ विरुद्ध ‘महता’ अशी लढाई होती. भाजपाच्या राजेश महता (RAJESH MAHATA) यांनी टीएमसीच्या अजीत महता यांना पिछाडीवर टाकले आहे. तर नयाग्राम विधानसभा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलताना दिसत आहे. या मतदारसंघात भाजपचे अमिया किस्कू यांनी टीएमसीच्या दुलाल मूर्मलावर मोठी आघाडी घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रचार केला होता. ते थेट लोकांमध्ये मिसळले होते. रस्त्याच्या कडेला एका दुकानात झालमुडी खालली होती. हे झालमुडी केवळ दहा रुपयांची होती. मोदी यांना दुकानदाराला याचे दहा रुपये मोजले होते.

follow us