ज्योतिरादित्य सिंधियांचा पुन्हा राहुल गांधींवर हल्लाबोल

ज्योतिरादित्य सिंधियांचा पुन्हा राहुल गांधींवर हल्लाबोल

Jyotiraditya Scindia On Rahul Gandhi : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia)यांनी आज (दि.10) काँग्रेस (Congress)नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्या अदानी प्रकरणी केलेल्या ट्विटवर (Tweet) हल्लाबोल केला. सिंधिया म्हणाले की, हे स्पष्ट आहे की आता तुम्ही ट्रोलपुरते मर्यादित आहात. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून मुख्य मुद्द्यांवरून लक्ष वळवण्याऐवजी तुम्ही या तीन प्रश्नांची उत्तरे का देत नाही? असा सवाल करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

दिलासादायक! नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट, जाणून घ्या मुंबईची स्थिती

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पहिला प्रश्न विचारला की, मागासवर्गीयांच्या संदर्भात केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल तुम्ही माफी का मागत नाही? उलट ते म्हणतात की, तुम्ही सावरकर नाही, माफी मागणार नाही. देशाच्या सेवकाचा अपमान आणि एवढा अहंकार. दुसरा प्रश्न, ज्या न्यायालयाकडे काँग्रेसने नेहमीच बोटे दाखवली, ते आज आपल्या स्वार्थासाठी त्यावर दबाव का आणत आहेत? असाही सवाल केला आहे.

मंत्री सिंधिया यांनी तिसरा प्रश्न विचारला की तुमच्यासाठी नियम वेगळे का असावेत? तुम्ही स्वतःला प्रथम श्रेणीचे नागरिक समजता का? तुम्ही अहंकारात इतके गुंतलेले आहात की कदाचित या प्रश्नांचे महत्त्व तुमच्या समजण्याच्या पलीकडे आहे. याआधीही ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube