14 तासांचा माणुसकीचा प्रवास! हरवलेले डेबिट कार्ड परत करण्यासाठी अनोळखी ‘कृष्णा’ धावत सुटला

Debit Card आजच्या धावपळीच्या आणि संशयाने भरलेल्या जगात, माणुसकी हरवत चालली असल्याची ओरड वारंवार केली जाते पण...

  • Written By: Published:
Kerala Man Return Lost ATM Card

Kerala Man Travels 14 Hours To Return Lost Debit Card : आजच्या धावपळीच्या आणि संशयाने भरलेल्या जगात, माणुसकी हरवत चालली असल्याची ओरड वारंवार केली जाते किंवा ऐकली जाते. मात्र, केरळमधील एका घटनेने ही धारणा पूर्णपण खोटी ठरवली आहे. एका अमेरिकन महिला पर्यटकाचे हरवलेले डेबिट कार्ड परत करण्यासाठी एका स्थानिक तरुणाने चक्क 14 तासांचा प्रवास करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे. सध्या या घटनेती देशभरात जोरदार चर्चा होत आहे.

नेमकं काय घडलं?

तर, इंडिया विटकिन ही अमेरिकन महिला केरळमध्ये एकटीच पर्यटनासाठी आली होती. त्या दिवशी सकाळी मी अमेरिकेला काहीतरी पाठवण्यासाठी डीएचएल (DHL) मध्ये गेले होते. डीएचएलच्या कर्मचाऱ्याने आणि मी एकमेकांचे नंबर घेतले, कारण भारतातले बहुतेक व्यवहार व्हॉट्सॲपवरूनच होतात. पण, एटीएममधून पैसे काढताना चुकून तिचे डेबिट कार्ड मशीनमध्येच राहिले. पाच तासांच्या अंतरावरील तिरुवनंतपुरम शहरात पोहोचल्यावर तिला ही बाब लक्षात आली. त्यानंतर विटकिनने तातडीने संबंधित DHL कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून कार्ड शोधण्याचा प्रयत्न केला, पण रविवारी कुरिअर सेवा बंद असल्याने ते कार्ड मिळवणे कठीण झाल्याचे विटकिनने तिच्या इंन्टा पोस्टमध्ये नमुद केले आहे.

अन् सुरू झाला ATM परत करण्याचा प्रवास

विटकिनला तिचे विसरलेले एटीएम परत करण्यासाठी कृष्णा नावाच्या एका स्थानिक तरुणाने पुढाकार घेतला. इंडिया विटकिन लवकरच भारत सोडून जाणार होती, हे पाहून कृष्णाने आपल्या दोन मित्रांसोबत एका टुक-टुकमधून तब्बल सहा तास प्रवास केला आणि स्वतः जाऊन त्या महिलेला कार्ड सुपूर्द केले. या संपूर्ण प्रवासासाठी त्यांना 14 तास लागले, मात्र या तरुणाने आपल्या सुट्टीच्या दिवसाची पर्वा न करता मदतीचा हात पुढे केल्याने त्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

पैशांपेक्षा माणुसकी श्रेष्ठ

या सर्व घटनेत सर्वात भावूक करणारी गोष्ट म्हणजे, जेव्हा इंडिया विटकिनने या मदतीच्या बदल्यात कृष्णाला काही रक्कम देऊ करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कृष्णाने ती नम्रपणे नाकारत. ‘तुम्हाला तुमचा प्रवास कमी खर्चात करायचा आहे, त्यामुळे हे पैसे तुम्हीच ठेवा,’ असे सांगत त्याने प्रामाणिकपणाचा एक आदर्श निर्माण केला.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

इंडिया विटकिनने हा संपूर्ण अनुभव सोशल मीडियावर व्हिडिओसह शेअर केला आहे. या व्हिडिओवर हजारो यूजर्सने प्रतिक्रिया दिल्या असून, अनेकांनी केरळच्या लोकांच्या मदतीच्या स्वभावाचे आणि प्रामाणिकपणाचे भरभरून कौतुक केले आहे. एक एटीएम कार्ड परत करण्याच्या या घटनेने केवळ त्या महिलेचाच नाही, तर जगातील लाखो लोकांचा माणुसकीवरील विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे हे मात्र नक्की.

 

View this post on Instagram

 

A post shared by India Witkin (@indiawitkin)

follow us