सगळीकडे नुसती चर्चा! पठ्ठ्या क्यूट पोरीसोबत ‘डेट’वर गेला अन् खिशाला ‘थेट’ होल झाला

Beautiful Girl पोरगी भेटली, गोड गोड बोलली. पठ्ठ्या पण नवीन कपडे अत्तर मारून टिपटॉप पोहोचले. समोर पोरगी बघून साहेबांची कळीच खुलली.

  • Written By: Published:
सगळीकडे नुसती चर्चा! पठ्ठ्या क्यूट पोरीसोबत 'डेट'वर गेला अन् खिशात 'थेट' होल झाला

Boy On Date With Beautiful Girl :  आजकल फेसबुक, इन्स्टाग्राम आणि डेटिंग ॲप्सवर कुणाशीही मैत्री करणं सोपं झालंय, पण हीच मैत्री कधी ‘खिसा कापायला’ येईल सांगता येत नाही. कोलकात्याच्या एका तरुणाला याचाच कडू अनुभव आला आहे. एका ‘क्यूट’ मुलीच्या नादात साहेब डेटवर गेले, पण तिथे गेल्यावर जे घडलं, ते ऐकून तुम्हालाही वाटेल की बाबा, यापेक्षा आपलं सिंगल राहिलेलं बरं. नेमकं काय घडलं जाणून घेऊया…

नेमका काय झोल झाला?

कोलकत्याच्या पोराला सोशल मीडियावर एक पोरगी भेटली, गोड गोड बोलली. पठ्ठ्याला वाटलं, “चला, देवाघरचं देणं आलं. मुलीनेच भेटीसाठी ‘रानीकुठी’ भागातील एक ‘कपल कॅफे’ निवडला. साहेब पण नवीन कपडे इस्त्री करून, अत्तर मारून टिपटॉप पोहोचले. समोर पोरगी बघून साहेबांची कळीच खुलली. कॉफी आली, गप्पा रंगात आल्या, सोबत हुक्क्याचा धूर पण हवेत उडू लागला. पठ्ठ्या स्वप्नात होता की, “आता
लवकरच लग्नपत्रिका छापायला घेऊ!

पण खरी गोची ‘बिल’ आल्यावर झाली. वेटरने जेव्हा बील हातात टेकवलं, तेव्हा पठ्ठ्याला 840 व्होल्टचा झटकाच बसला. फक्त कॉफी आणि हुक्क्याचं बिल थोडं थोडकं नव्हे तर, 8 हजार 500 रुपये आलं होतं. ते पाहताच पठ्ठ्या ओरडला, अरे, एवढं काय सोन्याचं पाणी घातलंय का कॉफीत?” त्यावर कॅफेचे बाउन्सर सारखे पोरं गोळा झाले आणि दबाव टाकू लागले. धक्कादायक म्हणजे, ज्या पोरीच्या डोळ्यात बघून आपण काहीवेळापूर्वी गप्पा मारत होते, ती पोरगी बिल बघताच ‘कधी पसार झाली’ ते कळलंच नाही. तेव्हा कुठे या महाशयांना समजलं की, आपण एका मोठ्या स्कॅममध्ये अडकलो आहोत.

कॅफे आणि मुलीचं ‘कनेक्शन’?

तपासात असं समोर आलंय की, बिलात अशा अनेक गोष्टी लावल्या होत्या ज्या त्यांनी ऑर्डरच केल्या नव्हत्या. हा कोणताही योगायोग नसून एक प्रकारची ‘ऑर्गनाईज्ड फसवणूक’ (Organized Scam) आहे. अनेकदा असे काही कॅफे अशा मुलींना हाताशी धरतात, ज्या मुलांच्या भावनांशी खेळून त्यांना तिथे आणतात आणि नंतर बिलाच्या नावाखाली लुटलं जातं.

सोशल मीडियावर चर्चा, फुकटचं प्रेम महागात पडलं

या घटनेनंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडलाय. कुणी याला जगातील सर्वात महागडी कॉफी” म्हणतंय, तर कुणी “सावध राहण्याचा” सल्ला देतंय. त्यामुळे तुम्हीदेखील पहिल्यांदाच कुणाला भेटायला जात असाल, तर कॅफे किंवा हॉटेल तुम्ही स्वतः निवडा. अनोळखी ठिकाणी जाण्यापूर्वी गुगलवर त्या ठिकाणचे रिव्ह्यू नक्की वाचा आणि हो जर समोरची व्यक्ती एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाण्यासाठीच आग्रह धरत असेल, तर नक्कीच पाणी कुठेतरी मुरतंय हे ओळखा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्डर देण्यापूर्वी मेन्यू कार्डमधील किमती नीट तपासा.
थोडक्यात काय तर, ऑनलाईनच्या जगात ‘लाईक’ आणि ‘हार्ट’ पाठवणं सोपं असलं, तरी प्रत्यक्षात भेटताना स्वतःचा खिसा आणि सुरक्षा सांभाळणं जास्त गरजेचं आहे.

follow us