Video : नरेंद्र’ नावामुळे पाकिस्तानी बॉक्सर वैतागला; PM मोदींसमोर भारतीय बॉक्सरने सांगितला किस्सा
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये पदक मिळवलेल्या भारतीय खेळाडूंची मोदींनी भेट घेतली. यावेळी बेरवाल यांनी एक किस्सा सांगितला.
Pakistan Opponent Told India Boxer “I Hate The Name Narendra”. How PM Modi Reacted : भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये मैदानावरील चुरस नेहमीच चर्चेचा विषय ठरते. मात्र, काही वेळा सामन्यानंतरचे किस्सेही तितकेच रंजक असतात. असाच एक मजेशीर किस्सा कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या भारतीय बॉक्सर नरेंदर बेरवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान सांगितला. 2015 च्या वर्ल्ड मिलिटरी गेम्समध्ये पाकिस्तानच्या बॉक्सरला पराभूत केल्यानंतर त्याने केलेल्या एका भन्नाट टिप्पणीची आठवण बेरवाल यांनी यावेळी सांगितली.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी मिळाला होता खास आदेश
नरेंदर बेरवाल यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, 2015 वर्ल्ड मिलिटरी गेम्समध्ये पाकिस्तानच्या बॉक्सरविरुद्ध त्यांची पहिली लढत झाली होती. या सामन्यापूर्वी भारतीय लष्कराकडून पाकिस्तानकडून पराभूत होता कामा नये, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली होती असेही सांगितले. बेरवाल यांनी हा सामना 4-1 आणि 3-2 अशा चांगल्या फरकाने जिंकला.
‘भाईजान, एक बात बोलूं?’
खरा मजेदार किस्सा मात्र सामन्यानंतर घडला. बेरवाल यांच्यासोबत असलेल्या भारतीय लष्कराच्या कोचचे नाव नरेंद्र राणा होते. सामना गमावल्यानंतर पाकिस्तानी बॉक्सर काही वेळ विचार करत राहिला आणि अखेर त्याने बेरवाल यांना विचारलं की, “भाईजान, एक बात बोलूं?” बेरवाल यांनी होकार दिल्यानंतर त्याने म्हटलं की, “आपका नाम नरेंद्र है, आपके कोच का नाम नरेंद्र है और आपके प्रधानमंत्री का नाम भी नरेंद्र है. मुझे नरेंद्र नाम से नफरत हो गई है.” पाकिस्तानी बॉक्सरची ही गंमतीशीर टिप्पणी ऐकून बेरवाल यांनाही हसू आलं होतं. आता तब्बल 11 वर्षांनंतर त्यांनी हाच किस्सा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सांगितला.
किस्सा ऐकून मोदीही हसले
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये पदक मिळवलेल्या भारतीय खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बेरवाल यांनी हा जुना किस्सा सांगितला. ‘नरेंद्र’ नावाशी संबंधित हा किस्सा ऐकून पंतप्रधान मोदीही हसले. नरेंदर बेरवाल हे भारतीय लष्कराशी संबंधित बॉक्सर असून 90 किलोपेक्षा अधिक वजनाच्या गटात भारताचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतही पदक मिळवलं असून 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी रौप्यपदक पटकावलं. भारत-पाकिस्तान सामन्याची रंगत, त्यानंतरची गंमतीशीर बातचीत आणि ‘नरेंद्र’ नावाची जुळलेली योगायोगाची मालिका आणि आता बेरवाल यांनी सांगितलेला किस्सा PM मोदींसोबतच्या खेळाडूंच्या भेटीत चांगलाच चर्चेचा ठरला.
#WATCH | "Pakistani boxer said to me 'Aapka naam Narender hai, aapke coach ka naam Narender hai, aapke Pradhan Mantri ka naam Narendra hai. Mujhe Narendra naam se nafrat ho gayi hai'…" says Heavyweight boxer and silver medallist Narender Berwal narrating his conversation with a… pic.twitter.com/qvmwO5D2sz
— ANI (@ANI) August 10, 2026