आता फेसबुकच्या ब्लू टीकसाठीही पैसे मोजावे लागणार

आता फेसबुकच्या ब्लू टीकसाठीही पैसे मोजावे लागणार

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी ट्विटर (Twitter)हँडलवरील ब्लू टीकसाठी (Blue Tick)पैसे मोजावे लागणार म्हणून यूजर्स (User) आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर आता मात्र मार्क झुकरबर्गच्या (Mark Zuckerberg)फेसबुकबाबतच्या (Facebook)मोठ्या घोषणेनंतर फेसबुक यूजर्सनाही धक्का बसल्याचं दिसून येतंय. आता फेसबुकच्या ब्लू टीकसाठी देखील पैसे मोजावे लागणार आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम (Instagram)आणि व्हॉट्सअॅपची (Whats App)मूळ कंपनी मेटानंही प्रीमियम व्हेरिफिकेशन सर्व्हिसची घोषणा केलीय.

सध्या या प्रीमियम व्हेरिफिकेशनची सुरुवात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये करण्यात येणारंय. त्यानंतर इतर देशातही सुरुवात होणारंय. (Facebook)वेबसाठी त्याची किंमत 11.99 डॉलर्स आणि ioS साठी त्याची किंमत 14.99 डॉलर्स (1241रुपये) एवढी असल्याची माहिती समोर आलीय.

दिल्लीत असदुद्दीन ओवेसी यांच्या घरावर हल्ला, दगडफेक करून काच फोडली

ट्विटरनं नुकतीच त्याची ट्विटर ब्लू पेड सबस्क्रिप्शन सेवा लाँच केली. त्यासाठी दरमहा यूजर्सना पेड सबस्क्रिप्शन प्लान घ्यायचा असल्यास 900 रुपये मोजावे लागतील. तर सर्वात कमी सबस्क्रिप्शन प्लान हा 650 रुपयांचा असून हा फक्त वेबसाठीच असणारंय. आता ट्विटरनंतर फेसबुकसुद्धा सेवा पेड करण्यावर भर देत असल्याचं पाहायला मिळतंय. फेसबुकचा प्रीमियम प्लान हा ट्विटरपेक्षाही महागडा असल्याचं दिसून येतंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube