केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच बदल, नितीन गडकरींना मोठा धक्का; खातं जाणार?

Union Cabinet : लोकसभा निवडणूक 2029 वर लक्ष केंद्रीत करत आगामी पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Union Cabinet

Union Cabinet : लोकसभा निवडणूक 2029 वर लक्ष केंद्रीत करत आगामी पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होणार असल्याची चर्चा सध्या देशातील राजकारणात सुरु आहे. पंतप्रधान मोदी मोठा निर्णय या विस्तारात अनेक मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात नवा चेहऱ्यांना जास्त संधी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना देखील मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार, या विस्तारात मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे तर नितीन गडकरी यांच्याकडचं खातं काढून त्यांच्याकडे दुसरे खातं दिलं जाणार आहे.

माहितीनुसार, पंतप्रधान मोदी या मंत्रिमंडळात 16 ते 17 नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी खासदारांशी संवाद साधायला देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे भाजपसाठी महत्त्वाची मानली जाणारी पंजाब (Punjab) आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीमूळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पंजाब आणि उत्तर प्रदेशातून जास्त संधी देण्यात येणार असल्याची देखील सध्या माहिती समोर आली आहे.

इतरांना संधी देण्यासाठी केंद्रीत मोठे फेरबदल होणार आहे. यामुळे अनेक मंत्र्यांना बाहेरचा रास्ता दाखवण्यात येणार आहे. तर जे मंत्री चांगलं काम करत आहेत त्यांना इतर वेगळं खातं दिलं जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या केंद्रात अनेक मंत्र्यांकडे तीन ते चार मंत्रिपदे आहेत. अशा मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी करुन ते इतरांना दिलं जाण्याची देखील शक्यता आहे. सध्या 14 मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त खाते असून 69 मंत्री असल्याने 12 मंत्रिपदे रिक्त आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; 4 खेळाडू बाहेर?

सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये विस्तार

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, जन्माष्टमीच्या आसपास हा विस्तार होण्याची शक्यता आहे. तर या विस्तारात पंजाब, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला जास्त प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता आहे.

follow us