‘व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही’; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर SC चं अजब विधान

तुम्ही आमचा वेळ वाया घालवत आहात, आम्हाला व्हिडिओ पाहण्यात रस नाही', संसद मोर्चादरम्यान झालेल्या लाठीचार्जवर सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?

  • Written By: Published:
Letsupp Image   2026 07 22T114209.414

We don’t have time to watch videos’, CJI Surya Kant On Jantar Mantar LathiCharge :जंतर-मंतर येथील आंदोलकांवरील कथित पोलीस कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. याचिकाकर्त्याच्या वकिलाने न्यायालयाला व्हिडीओ पाहून स्वतःहून दखल घेण्याची विनंती केली, परंतु सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की, व्हिडीओ पाहण्यासाठी न्यायालयाकडे वेळ नाही.

सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी न्यायालयाला माहिती दिली की, नीट (NEET) परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) बरखास्त करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत होते. त्यांनी न्यायालयाच्या हस्तक्षेपासाठी आवाहन केले. सुनावणीदरम्यान, भारताचे सरन्यायाधीश (CJI) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हस्तक्षेप करण्यास नकार देत खंडपीठाने न्यायालयाचा वेळ अशा प्रकारे वाया घालवू नये, असे सांगून हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

वेळ वाया घालवू नका

आज सर्वोच्च न्यायालयात कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र, सरन्यायाधीशांनी हे प्रकरण तात्काळ ऐकण्यास नकार दिला. जेव्हा वकिलाने व्हिडिओ पाहण्याची मागणी केली, तेव्हा ते म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका.” सुनावणीदरम्यान, वकील नरेंद्र मिश्रा यांनी सीजेपीच्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कथित हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचे वकिलांनी सांगितले. त्यांच्याकडे या घटनेचे तीन अर्ज आणि व्हिडिओदेखील आहेत.  यावर कोर्टाने “आमचा किंवा तुमचा वेळ वाया घालवू नका; आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत.” अशी टिप्पणी केली.

पोलिसांच्या कारवाईत शेकडो आंदोलक जखमी

पोलीस कारवाईत शेकडो आंदोलक जखमी झाल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. विरोधी पक्षही असेच दावे करत आहे. सीजेपीच्या एका प्रवक्त्याने या दिवसाला भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक लाजिरवाणा दिवस म्हटले आहे. ते म्हणाले की, एका वैध मुद्द्यावर आंदोलन करण्यासाठी आलेल्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी निर्घृणपणे मारहाण केली. 

follow us