पतीने धडापासून डोकं केलं वेगळं! लग्नाच्या 6 महिन्यांतच पत्नीचा निर्घृण खून, नक्की काय घडलं?

शेजाऱ्यांच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी रिया आणि रामानुजन यांच्यात कोणत्यातरी कारणावरून जोरदार वाद झाला होता.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 07T170959.678

आसाममधील गुवाहाटी येथील हाटीगाव (Assam) परिसरात लग्नाच्या अवघ्या 6 महिन्यांनंतर एका महिलेची तिच्या पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 वर्षीय रिया तालुकदार असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती रामानुजन गोस्वामी याच्यावर हत्येचा आरोप आहे. दोघेही भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. घटनेनंतर रामानुजन फरार झाला असून त्याचा मोबाईलही बंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

रविवारी शेजाऱ्यांना फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घराची झडती घेतली असता फ्रिजमध्ये महिलेचे डोके सापडल्याची माहिती समोर आली आहे. मृतदेहाची अवस्था खराब झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी पतीचा शोध सुरू केला आहे.

देवाच्या दारात उलगडणार रहस्याचा खेळ; ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक टिझर प्रदर्शित

शेजाऱ्यांच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी रिया आणि रामानुजन यांच्यात कोणत्यातरी कारणावरून जोरदार वाद झाला होता. त्यानंतर रात्री सुमारे 9 वाजता रामानुजन घरातून बाहेर पडला. रिया फॅन्सी बाजारातील एसी मार्केट परिसरातील एका बुटीकमध्ये काम करत होती, तर रामानुजन कॅब चालक असल्याचे सांगण्यात येत आहे. रियाचे आई-वडील नसून कुटुंबात तिचा एक भाऊ आहे. पोलिसांनी त्याला घटनेची माहिती दिली आहे.

दरम्यान, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. रामानुजनचे वडिलोपार्जित घर गौरीपूर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथेही तपास केला, मात्र तो सापडला नाही. रियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासातून हत्येमागचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us