अमृतपाल सिंग आत्मसमर्पण करणार? पोलीस बंदोबस्तात वाढ
नवी दिल्ली : खलिस्तानची (Khalistani)मागणी करणारा अमृतपाल सिंग (Amritpal Singh)जवळजवळ दोन आठवड्यांपासून पंजाब पोलिसांना (Panjab Police)गुंगारा देत आहे. आता पंजाब पोलिसांना चकवा देणारा अमृतपाल सिंग आत्मसमर्पण(surrender) करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी सकाळी तो होशियारपूर(Hoshiarpur) जिल्ह्यात दिसून आला. त्यानंतर मात्र पोलिसांना चकवा देऊन तो फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर अमृतसरमधील (Amritsar)पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अमृतपालसिंग पवित्र सुवर्णमंदिर (golden temple)परिसरात येण्याची दाट शक्यताही पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
घराणेशाहीच्या मुद्द्यावरून कंगणा राणौत भडकली, म्हणाली, “गँग करुन…”
अनेक दिवसांपासून पोलीस अमृतपाल सिंगच्या मागावर पंजाब पोलीस होते. त्यानंतर पंजाब पोलिसांमध्येही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर जालंधर ग्रामीणच्या एसएसपी स्वर्णदीप सिंह यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची अमृतसरमध्ये डीसीपी इन्व्हेस्टिगेशन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अमृतपाल सिंग स्वतः उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खेरी, हरियाणातील कुरुक्षेत्र आणि दिल्लीसह विविध राज्यांमध्ये पलायन केल्यानंतर तो आता आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत आहे. अमृतपाल सिंग एखाद्या गुरुद्वाऱ्यामध्येच आत्मसमर्पण करु शकतो, अशी चर्चा आहे.
यादरम्यान, प्रशासनाने अमृतसर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांचा कडक बंदोबस्त वाढवला आहे. याचं कारण म्हणजे, पवित्र सुवर्णमंदिर याच जिल्ह्यात आहे. त्यामुळे याठिकाणी अमृतपाल सिंग येण्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. त्या ठिकाणी जाऊन धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न करू शकतो, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.