पहाटेच्या शपथविधीवर…? अजित पवारांचा गौप्यस्फोट

पहाटेच्या शपथविधीवर…? अजित पवारांचा गौप्यस्फोट

जालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ३ वर्षांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) व देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) झालेल्या शपथविधीबाबत केलेला गौप्यस्फोट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भल्या सकाळी देवेंद्र फडणवीसांसह शपथ घेतल्यामुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली अशा आशयाचं विधान जयंत पाटलांनी केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामधील नेतेमंडळींनीही प्रतिक्रिया दिली असून आता खुद्द अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर राज्यात परत एकदा तर्क-वितर्कांना उधाण आलं “त्यावेळी मी स्वत: म्हटलं होतं की तो विषय मी कदापि काढणार नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत. जालन्यामध्ये पत्रकारांनी अजित पवारांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी यावर पुन्हा एकदा सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील? फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते. राष्ट्रपती राजवट उठवणे आवश्यक होते, त्यामुळे पवारांची ती खेळी असू शकते, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होते. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र हे सरकार फारकाळ टिकू शकले नाही. मात्र हा पहाटेचा शपथविधी मात्र देशभरात चर्चेचा विषय ठरला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube