अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारच… वेट अँड वॉच…
Ajit Pawar will be the Chief Minister of Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री होणार अशा चर्चा रंगात आहे. तसेच त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून दादांचे बॅनर देखील लावण्यात आले आहे. यातच स्वतः अजित पवारांनी देखील मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त करून दाखवली आहे. दरम्यान आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, वेट अँड वॉच… असे सूचक वक्तव्य मिटकरी यांनी केले आहे. मिटकरींच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
आमदार अजित पवार हे पक्षात अस्वस्थ असल्याच्या चर्चा होत्या. यातच ते भाजपसोबत जातील असा दावा केला जात होता. मात्र या चर्चांना खुद्द अजित पवारांनी पूर्णविराम दिला. यांनतर एका कार्यक्रमात अजित पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री होण्याची इच्छा देखील बोलवून दाखवली. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे बॅनर देखील झळकवण्यात आले होते. यामुळे या चर्चाना अधिकच जोर आला होता. यातच आता अमोल मिटकरी यांनी केलेले वक्तव्य पाहता येत्या काळात राजकारणात काहीतरी घडणार असे संकेत मिळते आहे.
नेमकं काय म्हणाले होते मिटकरी?
अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारच. त्यासाठी फक्त वेट अँड वॉच. अमित शहांनी सुद्धा अजित पवारांचे कौतुक केले. महाराष्ट्राचं राजकारण सांभाळेल असा अजित पवारांसारखा दुसरा नसल्याचे अमित शहा स्वतः म्हणालेत, याची आठवणही करून दिली. महाविकास आघाडीचे सरकार येणाऱ्या काळात येईल. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
फडणवीसांनी हे मान्य केले
अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले आहे. यातच लोकशाहीमध्ये प्रशासनावर पकड असलेली अभ्यासू व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असावी अशी अनेकांची इच्छा आहे. याच कारणामुळे धाराशिव आणि नागपूरमध्ये काही बॅनर लागले. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही बाब मान्य केली असल्याचे वक्तव्य मिटकरी यांनी केले आहे.
जयंत पाटीलही रेसमध्ये…
सध्या मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्या नेत्याच्या पदरात पडावी यासाठी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी सुरु आहे. यातच भावी मुख्यमंत्री म्ह्णून अजित पवार यांचा उल्लेख अमोल मिटकरी यांनी केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील यांचे नाव घेतले. कोल्हे म्हणाले , जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षात जयंत पाटलांच्या ताकदीचा दुसरा उमेदवार नसल्याचे त्यांनी सांगितले.
राजकीय भूकंप! ठाकरे गटासह राष्ट्रवादीचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात
पक्षातील वाद चव्हाट्यावर
राज्यातील राजकारणात येत्या काळात मोठे फेरबदल होणार अशा चर्चा सध्या सुरु आहे. यातच नेत्यांचे दावे यावरून या चर्चांना उधाण आले आहे. सध्या राष्ट्रवादी पक्षातील नेतेमंडळी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा समोर येत आहे. यातच खासदार कोल्हे यांनी जयंत पाटील यांचे नाव घेतले. त्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून घेतले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधले मतभेदही चव्हाट्यावर आलेत.