मठात बसून गांजा फुकणाऱ्यानं… मिटकरींचा कालिचरण महाराजांना टोला

WhatsApp Image 2022 12 27 At 7.35.15 AM

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच टीकेची झोड उठविणारे कालिचरण महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. देश आणि धर्मासाठी हत्या करणं हे वाईट नाही, असं वादग्रस्त वक्तव्य अकोल्याचे कालिचरण महाराज यांनी केलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार मिटकरी म्हणाले, कालिचरण महाराज हा व्हाह्यात माणूस असून त्याच्यासारख्या मठात बसून गांजा फुकणाऱ्यानं आम्हाला शिकवू नये, अशा शब्दात मिटकरी यांनी कालिचरण महाराजांना सुनावलं आहे.

नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?
कालीचरण हा काही कॅबिनेट मंत्री नाही, तो एक व्हाह्यात माणूस आहे. कालीचरणला हिंदू धर्माबद्दल एवढी आस्था असेल, तर त्याने हिंदू मुलांच्या रोजगाराबाबत बोलावं, हिंदू शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, त्यावर बोलावं. कालीचरणने ज्या भाषेचा वापर केला आहे, त्यावरून या व्यक्तीमध्ये संताचे कोणतेही गुण दिसत नाही, असेही मिटकरी म्हणाले.

कालिचरण असेल किंवा साध्वी प्रज्ञा, असा लोकांना महत्त्व देण्याचं कारण नाही. त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी पाकिस्तान किंवा चीनच्या बॉर्डरवर लढायला जावं. त्यामुळं मठात बसून गांजा फुकणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दात अमोल मिटकरींनी कालिचरण महाराजांवर सडकून टीका केली आहे. Reaction On On

Tags

follow us