Bachhu Kadu : राष्ट्रवादीच काय… कोणताच पक्ष शिंदे-फडणवीस समोर राहणार नाही!

Bachhu Kadu : राष्ट्रवादीच काय… कोणताच पक्ष शिंदे-फडणवीस समोर राहणार नाही!

Bachhu Kadu : ईडी, सीबीआयचा नाही. तर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचा दरारा मोठा आहे. त्यामुळे राज्यात त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसच काय इतर एकही पक्ष राहणार नाही, असा दावा प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तथा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे लवकरच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जॉईन होणार आहे, अशा बातम्या येत आहेत. तुम्ही त्यांचे स्वागत करणार का, तसेच ईडी, सीबीआयचा धाक दाखवूनच विरोधी पक्षातील लोकांना आपल्याकडे घेतले जात आहे, असा आरोप होत आहे. यावर बच्चू कडू म्हणाले की, अजित पवार यांना कोणतीही ईडी, सीबीआयचा धाक दाखवला नाही. तर शिंदे-फडणवीस यांच्या कामाचा एवढा दरारा आहे. मी म्हणेल दबाव नाही तर प्रभाव आहे. त्यामुळे सर्व जण येत आहेत.

एकनाथ शिंदे अटकेच्या भितीने मातोश्रीवर येऊन रडले ; आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट – Letsupp

बच्चू कडू म्हणाले की, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सनी देओलच्या ऍक्शनमध्ये दिसले. त्यांच्या कामाचा एवढा धडाका होता. त्यांनी आज अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांच्या कामाचा राज्याला भुरळ पडली आहे. त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसच काय इतर कोणतेच पक्ष शिल्लक राहणार नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube