तेलगी घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळाचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘मी सगळं मी…’

  • Written By: Published:
तेलगी घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळाचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘मी सगळं मी…’

Chhagan Bhujbal on Telgi Stamp Scams :  नाशिकमधील तेलगी बनवट मुद्रांक घोटाळ्यामुळे (Telgi Banvat Stamp Scams) तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)संशयाच्या भोवऱ्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणजे शरद पवारांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. ही सल भुजबळ यांनी बीडच्या सभेत बोलूनही दाखवली होती. माझी चुक नसतांनाही माझा राजीनामा घेण्यात आला होता, असं त्यांनी सांगितलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यात पुन्हा एकदा तेलगी बनावट मुद्रांक घोटाळ्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, त्यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलं.

आज माध्यमांशी बोलतांना भुजबळांना तेलगी प्रकरणाविषयी विचारले असता, ते म्हणाले की, तेलगी प्रकरणात माझी बदनामी झाली. मी गृहमंत्री असतांना मोक्का लावला होता. मात्र, माझा राजीनामा घेण्यात आला होता. हे सगळं मी वाचून दाखवलं, बोलून दाखवलं. जुनं झालं ते आता. आता गणपतीचा उत्सव आहे, आनंद साजरा करा. वादविवाद राहू द्या बाजूल. शल्य वगैरे नंतर बघू, असं म्हणत भुजबळांनी हा विषयी अधिक भाष्य करणं टाळलं.

‘लुटमार, गद्दारीचे दिवस जाणार अन् पुन्हा..,’; Aaditya Thackeray यांचा राज्य सरकारवर निशाणा 

सध्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आनंदाचा शिधा वापट केला जातोय. यावर बोलतांना ते म्हणाले की, सर्व दुकानांमध्ये 99 टक्के संच पोहोचला आहे. पन्नास टक्क्यांपर्यंत वाटपही झालं आहे. नाशिक जिल्ह्यात ३६ लाख लाभार्थ्यांना याचा लाभ होईल. दिवाळीच्या काळात आणि गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने देखील वाटप होईल. कुठेही काही तक्रार नाही. तक्रार असेल, तर आम्ही दुरुस्त करू. खराब माल असल्यास देऊ नका, अशा सूचना दिल्या आहे.

राज्यात शिधा वापट होतो. मात्र, नाशिकमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढले. यावेळी भुजबळांना नाशिकमधील कुपोषणाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की, कुपोषण निर्मुलनसाठी आदिवासी भागात ३५ किलो धान्य अंत्योदय योजनेतून दिलं जातं. कुपोषण वाढू नये, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले.

आदित्य ठाकरे हे सरकारवर कायम टीका करत असतात. छत्रपती संभाजीनगरमधील कॅबिनेटच्या बैठकीवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता. याविषयी भुजबळांना विचारले असता ते म्हमाले, आदित्य ठाकरे हे विरोधी पक्षाचे नेते आहे, ते टीका करणारच. त्यात खरंच घेण्यासारखे काही असेल, तर मंत्री विचार करतील, नाहीतर सोडून देतील. ते जर टीका करणार नाही, तर विरोधी पक्ष कसं म्हणायचं ?, असं भुजबळ म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube