माजी मित्र अन् राजकीय प्रतिस्पर्धी ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज; फडणवीसांची उपरोधिक टीका

माजी मित्र अन् राजकीय प्रतिस्पर्धी ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज; फडणवीसांची उपरोधिक टीका

Devendra Fadnvis News : उद्धव ठाकरे यांच्यावर राजकीय परिस्थितीचा विपरित परिणाम झालाय, त्यांनी मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा, असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना फडणवीसांना ‘नागपुरचा कलंक’ म्हणत टीका केली होती. त्यावरुन फडणवीस-ठाकरे वाकयुद्ध रंगलं आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडूनही उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. (Dcm Devendra Fadnvis Critisize Udhav Thackeray)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचे आजचे विरोधी आणि माजी मित्र उद्धव ठाकरे यांच्यावर सध्याच्या राजकीय परिस्थितीवर फारच विपरीत परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी आता मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्यावा, असा उपरोधिक टोला लगावला आहे.

भरधाव पिकअपची पाच वाहनांना धडक, जखमींवर उपचार सुरू, ड्रायव्हरला पोलिसांनी घेतले ताब्यात

तसेच उद्धव ठाकरे यांची मानसिक स्थिती आपणच समजून घ्यायला हवी, अशा स्थितीत एखादा माणूस बोलत असेल तर त्यावर प्रतिक्रिया न दिलेलीच बरी आहे, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. नागपूरात काल उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलच रडारवर घेतल्याचं दिसून आलं. यावेळी बोलताना ठाकरेंनी फडणवीस यांची एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीची ऑडिओ क्लिपच जनसमुदायाला ऐकवत ‘अरे काय हा नागपुरचा कलंक’ या शब्दांत सुनावलं होतं.

त्यात एवढं लागण्यासारखं काय तुम्ही पण…; ‘कलंकीत’ टीकेनंतर ठाकरे पुन्हा बरसले

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ‘नागपुरचा कलंक’ असा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांकडूनीही उद्धव ठाकरेंना ‘कलंकीचा काविळ’ म्हणत सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यासंदर्भात ट्विटर पोस्ट शेअर करीत ठाकरेंवर सडकून टीका केल्याचं दिसून आलं होतं.

एवढंच नाहीतर सावरकारांचा अवमान, कोरोना काळातील पैशांंनी भरलेल्या बॅगा आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व या मुद्द्यांमध्ये हात घालत फडणवीसांनी टीका करणारी पोस्ट लिहित उद्धव ठाकरेंना चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं होतं.

त्यानंतर आज पुन्हा उद्धव ठाकरेंनी टीकेची तोफ डागत ‘कलंक’ शब्द एवढा का लागला? असा सवाल केल्याचं दिसून आलं. सकाळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत पुन्हा ‘कलंक’ शब्दावरुन रणकंदन सुरु केलं. आता ठाकरेंच्या टीकेनंतर फडणवीसांनी त्यांना मानसोपचार तज्ञाची गरज असल्याचं म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube