विधानसभेत Sunil Shelke यांनी मंत्र्यांसमोरच मांडला मागच्या आठ महिन्यांचा हिशोब

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 04T123239.348

मुंबई :  राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ( Budget Session )  सुरु आहे. यावेळी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP )  मावळचे आमदार सुनिल शेळके ( Sunil Shelke )  यांनी मंत्र्यांना खडेबोल सुनावले आहेत. विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघातील कामे अडवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सभागृहात मंत्री उपस्थित असतानाच त्यांनी सरकारला सुनावले आहे. आम्हाला किमान आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांसाठी निधी तरी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्यात आठ महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार जावून शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. यानंतर आलेल्या नवीन सरकारने आमच्या कामांना स्थगिती दिल्याचा आरोप महाविकास आघाडीचे आमदार करत आहेत. यावरुन आज सभागृहातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांचे सरकारला सुनावले आहे.

Pankaja Munde : ‘घरात चपटी देणारा नेता’ म्हणत पंकजांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

माझ्या मतदारसंघातील लोणावळा परिसरात अनेक पर्यकट येत असतात. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने त्याभागात एक पोलिस स्टेशन मंजूर केले होते. तसेच पोलिसांच्या राहण्यासाठी वसाहत करायला देखील मंजूरी दिली होती, पण अद्याप याबाबत कोणताही निधी या सरकारने दिलेला नाही, असे त्यांनी सभागृहाला सांगितले. माझ्या मतदारसंघातील एकाही पुलाचे बांधकाम गेल्या आठ महिन्यात झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

हे सरकार आल्यापासून काही भागातील रस्ते जाणूनबुजून थांबवण्याचे काम चालू आहे. आमच्या सरकारच्या काळात ज्याकामांना मंजूरी मिळाली होती, त्या कामांना स्थगिती देण्याचे काम चालू आहे. कोविडच्या काळामध्ये जे हॉस्पिटल आम्हाला मंजूर केले गेले त्याचे काम देखील थांबवण्यात आले आहे, अशा शब्दात त्यांनी शिंदे सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. यावेळी त्यांनी सभागृहात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निदर्शनास या गोष्टी आणून दिल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube