Maharashtra Poltical Crisis: ‘जी कट कारस्थान रचली…; कोर्टाच्या निकालानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Maharashtra Poltical Crisis: ‘जी कट कारस्थान रचली…; कोर्टाच्या निकालानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Jayant Patil: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Poltical Crisis) आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निकाल जाहीर केला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाला मोठा धक्का देत शिंदेंना दिलासा दिला आहे. त्यामुळे आता हे स्पष्ट होतंय की, राज्यातील शिंदे सरकार बचावलं आहे आणि त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची खुर्ची देखील. याबाबत निर्णय देत असताना सर्वोच्च न्यायालयानं मोठं वक्तव्य केलं.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वखुशीनं राजीनामा दिला, त्यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार पुन्हा आणलं असतं, असं सर्वोच्च न्यायालयानं आपला निकाल जाहीर करताना म्हटलं आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सतेच्या भोवती गोळा झालेल्यांची हा क्षणिक आनंद असू शकतो. कसे, बसे आपले शिंदे सरकार वाचले, अशी थोड्या दिवसाची आनंदाची भावना राहू शकते. पण हे सर्व अवैध आहे. आणि भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात केलेली कृती चुकीची आहे.

Maharashtra Political Crisis : आम्हाला अजूनही विश्वास, न्यायालायाच्या निकालावर नरहरी झिरवळांची प्रतिक्रिया…

घटनेची पायमल्ली कशी झाली आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला सुप्रीम कोर्टाने आता सांगितले आहे. तसेच हे महाविकास आघाडीचे सरकार आहे, ते काढण्याच्या पद्धती त्यांना बदलण्यात त्यांनी जे कट कारस्थान रचली, आणि त्यांना ज्या पद्धतीने काढलं. किंबहुना उद्धव ठाकरेंवर परिस्थिती अशी निर्माण झाली होती की, त्यांना द्यावा लागला आहे. ही सर्व परिस्थिती बघता कोर्ट एवढंच म्हणत की उद्धव ठाकरे यांनी जर राजीनामा दिला नसता तर आम्ही हे सरकार इंस्टेंट करू शकलो असतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी दिली आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube