जयंत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उशीरा जाग
Jayant Patil On Eknath Shinde : राज्यात (Maharashtra)अवकाळी पावसाचा (Unseasonable Rain)कहर सुरु आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या (Farmer)हातातोंडाला आलेला घास हिरावला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)अयोध्या (ayodhya) दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री राज्यभराचा दौरा करत आहेत. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP)प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, अयोध्येची पूजाअर्चा संपल्यानंतर अवकाळी आणि गारपिटीमुळे राज्यातील गोरगरीबांचे उद्ध्वस्त झालेले संसार पाहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघाले आहेत. या दौऱ्यामुळे उशीरा का होईना पण शिंदे सरकारला जाग आली, असं म्हणत टोला लगावला आहे.
New York Indian Film Festival मध्ये अनुपम खेर यांच्या ‘रीटेक’ चा डंका !
जयंत पाटील म्हणाले की, आता केवळ प्रसिद्धी न करता अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीची तातडीने पूर्तता करावी ही विरोधकांची मागणी आहे. ही मदत मोठी असायला हवी, यातूनच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
अवकाळी पावसानं ज्या घटना झाल्या त्या अस्तित्वात नाहीत, त्या ठिकाणी पाणीही नाही, मग आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय पाहणी करणार आहेत? असाही सवाल यावेळी जयंत पाटलांनी केला आहे. मुख्यमंत्री आता ज्या ठिकाणी नुकसान झालं त्या दोन चार प्लॉटला भेटी देतील. त्यामुळे आता गरज दौऱ्याची नाही तर ती मदतीची गरज आहे. तातडीने ती मदत राज्य सरकार करणार आहे का? असाही सवाल यावेळी जयंत पाटील यांनी सरकारला केला आहे.
अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतामध्ये कोणतंही पीक शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत करण्याची गरज आहे. तर ती राज्य सरकारने करावी अशी मागणीही यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.