New York Indian Film Festival मध्ये अनुपम खेर यांच्या ‘रीटेक’ चा डंका !

Untitled Design   2023 04 11T182157.561

New York Indian Film Festival : अप्लॉज एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या आणि अनुपम खेर, जरीना वहाब आणि दानिश हुसैन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘रीटेक’ या शॉर्ट-फिल्मला अमेरिकेतील न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमिअरसाठी निवडण्यात आले आहे.

या शॉर्ट-फिल्मचे दिग्दर्शन आणि लेखन श्वेता बसु यांनी केलं आहे. हा चित्रपट एका 60 वर्षीय कलाकाराची कहाणी आहे. जो आपल्या गुरूंच्या अंत्यसंस्कारांवेळी आपल्या पहिल्या प्रेमिकेला आणि मित्राला भेटतो. त्यामुळे त्याला जीवनातील पर्याय आणि निवडीवर प्रश्न उपस्थित होतात. ही शॉर्ट फिल्म एंजेलिका न्यूयॉर्ककडून विलेज ईस्टमध्ये 13 मे ला दुपारी  12:15 वाजता दाखवण्यात येणार आहे.
Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती सोबतच्या लग्नाच्या चर्चांबद्दल राघव चढ्ढांचा मोठा खुलासा; म्हणाले…

न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये श्वेता बसु प्रसाद यांच्या निर्देशनात तयार झालेल्या पहिल्या चित्रपटाचा म्हणजे ‘रीटेक’ चा अमेरिकी प्रीमिअर दाखवण्यात येणार. तसेच या चित्रपटामध्ये संपादक म्हणूनआरती बजाज, साउंड डिजाइनर रेसुल पुकुट्टी (बाफ्टा आणिऑस्कर विजेता), संगीतकार राम संपत यांसारख्या पुरस्कार विजेत्यांचं योगदान आहे.

Tags

follow us