Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती सोबतच्या लग्नाच्या चर्चांबद्दल राघव चढ्ढांचा मोठा खुलासा; म्हणाले…
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. पण अद्याप दोघांनीही त्यांच्या लग्नबद्दल किंवा रिलेशनसंदर्भात कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाही. गेल्या काही दिवसाखाली आज तकला त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी परिणीती चोप्राबरोबरच्या लग्नाच्या चर्चांबद्दल खुलासा केला आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी लग्नाविषयीची माहिती दिली नसली तरी झटका मात्र त्यांनी दिला आहे. परिणीतीबरोबरच्या लग्नाच्या चर्चांविषयी राघव चढ्ढा यांना सवाल करण्यात आला होता, यावर त्यांनी हसत- हसत म्हणाले की,”लवकरच तुम्हाला सेलिब्रेशन करण्याची संधी मिळणार असल्याची माहिती राघव चढ्ढानी यावेळी दिली, हे उत्तर चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरले आहे.
View this post on Instagram
राघव चढ्ढा यांच्या या उत्तराने ते लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा तिच्या लेकीसह भारतात आली आहे. यानंतर लाडक्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी प्रियंका भारतात आली असल्याची चर्चा सुरु झाली झाली. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये परिणीती आणि राघवचा साखरपुडा होणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. पण तसं काही झालं नाही आणि ‘देसी गर्ल’ प्रियंकादेखील पुन्हा परदेशात गेली असल्याची माहिती आहे.
View this post on Instagram
दुसरीकडे परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. डिनर डेट आणि विमानतळावरचे त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विमानतळावर पापराझीने परिणीतीला राघव चढ्ढा यांच्याबद्दल सवाल केला असता तिने उत्तर देण्याचे टाळले आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी त्यांचे नाते गुलदस्त्यात ठेवले आहे. पण तरीही चाहत्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देत आहेत.
Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले
पंजाबी गायक हार्डी संधूने एका मुलाखतीमध्ये परिणीती आणि राघव यांच्या नात्याबद्दल भाष्य केले होते, तर दुसरीकडे आपचे संजीव आरोडा यांनी ट्वीट करत परिणीती आणि राघव यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार परिणीती आणि राघव गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. परदेशात दोघांनी शिक्षण घेतले आहे. परिणीतीचा ‘ऊंचाई’ हा सिनेमा नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला होता. आता तिचा ‘चमकीला’ आणि ‘कॅप्सूल गील’ हे सिनेमे चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज झाले आहेत.