राज ठाकरेंचा एकच आवाज; माहिमचा दर्गाच काय, हे वाचा त्यांच्या आंदोलनाचे रिझल्ट  

राज ठाकरेंचा एकच आवाज; माहिमचा दर्गाच काय, हे वाचा त्यांच्या आंदोलनाचे रिझल्ट  

मुंबई :  मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) काल गुढी पाडवा मेळाव्यात विविध मुद्द्यांवर भाष्य केले. एवढेच काय तर, त्यांनी या मेळाव्यात मुंबईतील माहीमच्या दर्ग्याचा मुद्दा उपस्थित केला. राज यांनी उपस्थित केलेल्या या मुद्याची प्रशासनानेदेखील तात्काळ दखल घेतत थेट माहीमच्या समुद्रात बांधल्या जाणाऱ्या मजारीवर कारवाई करत ती जमीनदोस्त केली. राज ठाकरेंनी माहीम येथील हा मुद्दा उपस्थित केल्याची पहिलीच वेळ नाहीये. याआधीदेखील राज ठाकरेंनी राज्यातील विविध प्रश्न उपस्थित करत त्याविरोधात आवाज उठवत आंदोलनं धेडली आहेत. ही आंदोलने केवळ आंदोलनचं नव्हती तर ती त्यांनी यशस्वीदेखील करून दाखवली आहेत. आज आपण यापूर्वी राज ठाकरेंनी छेडलेली आंदोलने आणि त्याचे नेमके रिझल्ट काय याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. 

१. शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य

‘महाराष्ट्राच्या भूमीवर जे जे काही उभं राहील आहे, त्याकरिता महाराष्ट्राच्या वाट्याला आली असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती खर्च होते. (Maharashtra Politics) राज्यात प्रत्येक शिक्षण संस्थेला मिळणारी वीज, पाणी व इतर संसाधनं ही महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला आलेला हिश्श्याचा भाग आहे. अशा वेळी शिक्षणसंस्था महाराष्ट्राच्या राजभाषेला (म्हणजेच मराठीला) अभ्यासक्रमात अनिवार्य न करता जर अभ्यासक्रम चालवत असेल, तर सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई. किंवा आय.जी.सी.एस.ई. वैगरे कोणत्याही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांशी संबंधित असेल, अशी कोणतीही माहिती मान्य न करता त्याविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उग्र आंदोलन उभं करावं लागल होत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षण संस्थेला मराठी विषय अनिवार्य करण्यास शिक्षणसंस्थांना भाग पाडलं.

२. आस्थापनांवर मराठी नामफलक

“मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि त्यामुळे सर्व संस्था, दुकाने, आस्थापनांना मराठी भाषेत पाट्या लावणे व व्यवहार करणे हे दुकाने आणि संस्था अधिनियम, १९४८ कलम ६२, नियम २० (अ) अन्वये बंधनकारक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्वाना सुधारणा करण्यासाठी एक महिन्याची मुदत डेन्ह्यात आली होती. कारण १ मे, १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्यात आंदोलने करण्यात आले होते. मराठी पाट्या, आपला व्यवहार मराठीत न दिसल्यास महाराष्ट्र राज्यातल्या जनतेकडून आपणास खास मराठी पद्धतीने मराठी शिकवण्याची व्यवस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेना केले होते.

३. मराठी भाषा दिन जल्लोषात साजरा होऊ लागला

२७ फेब्रुवारी या दिवशी भाषाप्रभू कवी कुसुमाग्रज यांची जयंती. या दिवशी महाराष्ट्रात ‘मराठी राजभाषा दिन’ फक्त काही रसिक आणि सजग नागरिक सोडले तर आणि शासकीय कचेऱ्यांमध्ये सुद्धा ‘दीन’वाण्या पद्धतीने साजरा केला जात असतो. परंतु ‘आपलं अस्तित्व, आपल्या मराठी भाषेचा सोहळा हा जल्लोषात साजरा झालाच पाहिजे’, अशी भूमिका मनसेनी घेतल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र ‘मराठी राजभाषा दिन’ उत्साहात साजरा होऊ लागला.

राज ठाकरे म्हणाले, मला शिवसेनापक्षप्रमुख व्हायचंच नव्हतं, कारण…

४. ‘टोल’धाडी विरोधात मोठं आंदोलन

भ्रष्ट राजकारणी, काही प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या चुकीच्या युतीमुळे महाराष्ट्रात जाचक ‘पथकर’ वसुली सुरु होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पथकाराला विरोध नाही. परंतु या पथकर वसुलीतून येणारा निधी कुठे जातो ? वर्षानुवर्षे पथकर वसुली करून देखील खड्डेविरहित आणि सुविधायुक्त रस्ते नागरिकांना का मिळत नाहीत ? नवतंत्रज्ञानाचा वापर करून या रोखीच्या व्यवहारात पारदर्शकता का आणली जात नाही? यावर त्यांचा आक्षेप होते. परंतु दोन पथकर नाक्यांमधील अंतर, त्या संपूर्ण मार्गावर कर्मचार्‍यांना गणवेश, नागरिकांशी सौजन्यपूर्ण व्यवहार, रोज गोळा होणार्‍या रकमेचा फलक, निरीक्षक, पोलिस, मदत व तक्रार केंद्रे, स्वच्छतागृह ह्या सुविधांची वाणवा असे ‘पथकर धोरणाचे’ सर्व कायदे पायदळी तुडवले जात होते.

५. रेल्वेभरती आंदोलन

महाराष्ट्रात रेल्वेभरतीत स्थानिक मुलं- मुलींना डावलून परप्रांतीयांना घुसविण्याचे प्रयत्न सुरु होत, असं समजताच राज ठाकरे यांनी मुंबईत एका सार्वजनिक कार्यक्रमात त्याविरोधात आवाज उठवला. महाराष्ट्रात रेल्वेभरतीची माहिती न देता, येथील स्थानिकांना अनभिज्ञ ठेवून ज्या राज्याचे (बिहारचे) रेल्वेमंत्री आहेत त्या राज्यात रेल्वे भरतीची जाहिरात दिली जाते आणि तिथून महाराष्ट्रात लोंढेच्या लोंढे रेल्वे भरतीसाठी आदळतात. हे जेव्हा महाराष्ट्र सैनिकांना दिसलं, तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आक्रमक आंदोलनं सुरु झालं. स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय्य रोजगाराचं हे आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं राज्यव्यापी आंदोलन ठरलं.

६. अनधिकृत रिक्षा-टॅक्सीविरोधात आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने अनधिकृत रिक्षा-टॅक्सी विनापरवाना वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधामध्ये मोहीम सुरु केली होती. प्रमुख शहरांमध्ये वाहनांचं सर्वेक्षण करण्यात आलं, परवान्यांची पडताळणी केली गेली आणि धक्कादायक वास्तव समोर आलं. ज्यांच्या विश्वासावर तुम्ही-आम्ही शहरात वाहतूक करत होतो, त्यातले हजारो रिक्षा-टॅक्सी ह्या अनधिकृत होत्या. यावरून मनसेनी आंदोलन छेडलं होत.

Raj Thackeray : ‘कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार पहिल्यांदा पाहिलं’

७. रझा अकादमीच्या सभेनंतर मोर्चा 

११ ऑगस्ट २०१२ रोजी मुंबईत आझाद मैदानात रझा अकादमीच्या सभेनंतर काही धर्मांध मुस्लिमांनी धुडगूस घालायला सुरुवात केली. पोलिसांवर आणि माध्यम प्रतिनिधींवर हल्ले केले. या सर्व दंगलीत सुमारे ५८ पोलीस गंभीर स्वरूपात जखमी झाले. कोट्यवधींच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं. इतकंच काय तर अब्दुल कादिर ह्या दंगेखोराने ‘अमर ज्योती जवान’ स्मारकाची नासधूस केली. यावर राज ठाकरेंनी आवाज उठवला होता.

८. दंडुका मोर्चा

२०१३ ते २०१८ महाराष्ट्राने दुष्काळाच्या झळा सोसल्या. प्रामुख्याने मराठवाडा दुष्काळात अगदी होरपळला होता. ह्या काळात दिवसाला सरासरी ४ शेतकरी आत्महत्या करत होते. ह्या भीषण परिस्थितीपुढे बळीराजा हतबल झाला. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकऱ्याने स्वाभिमानाने उभं राहावं, लढावं ह्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘दंडुका मोर्चा’ पुकारला.

९. पाकिस्तानी कलाकारांना हुसकावले!

जो देश दहशतवाद्यांना आसरा देतो, सातत्याने भारतावर दहशतवादी हल्ले करतो, ज्यात आमचे भारतीय सैनिक धारातीर्थी पडतात. अशा पाकिस्तानातील कलाकार भारतात येतात, इथल्या कलासृष्टीत धनसंपत्ती कमावतात आणि निघून जातात आणि पुन्हा तो पाकिस्तान भारतावर दहशतवादी हल्ला करतो. अशा ‘नापाक’ देशातील कलाकारांना भारतात का बोलावले जाते? त्यांना संधी का दिली जाते? १५० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात सरस कलावंत असतानाही पाकड्यांना आवताण का? असे उद्विग्न प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी कायम पाकड्या कलाकारांचा विरोध केला आहे.

Raj Thackeray : गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणानंतर राज ठाकरे विरोधात पुण्यात पोलिसात तक्रार

१०. त्रासदायक ‘भोंगे’ बंद केले

महाराष्ट्रात, महाराष्ट्र सैनिकांनी ठिकठिकाणी हनुमान चालीसा लावली, भोंग्यांचे आवाज थांबले. मुळात असं ध्वनिप्रदूषण कायद्याला पण मान्य नाही. पण हा कायदा मशिदींवरच्या भोंग्यांच्या बाबतीत विसरला जात होता. पण आमचं ‘हनुमान चालीसा’ आंदोलन सुरु झालं आणि राज्यात तर उमटलेच, पण देशभर उमटले. देशभर ह्या विषयवार हिंदू जनमत एकवटलं आणि उत्तरप्रदेश सरकारने याची दखल घेत भोंगे उतरवले. महाराष्ट्रात देखील तात्कालीन महाविकास आघाडी सरकारला नाईलाजाने ते भोंगे उतरवावे लागले. हिंदू जनशक्तीच्या एकजुटीचं हे एक अप्रतिम उदाहरण म्हणावं लागेल.

११. माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्ग्याबाबत आवाज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्ग्याबाबत आवाज उठवला. हा दर्गा अनधिकृत आहे. त्यावर कारवाई करा, नाही तर आम्ही तिथे गणपतीचं मंदिर बांधू, असा इशारा देतानाच राज ठाकरे यांनी प्रशासनाला कारवाईसाठी एक महिन्याची मुदत दिली. त्यांच्या या भाषणानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच कारवाई सुरु झाली. राज ठाकरे यांच्या इशाऱ्याला 24 तास उलटत नाही तोच मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने हे अतिक्रमण हटवले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube