हिंमत दाखवा, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याच ; राष्ट्रवादीने भाजपला ललकारले !

हिंमत दाखवा, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याच ; राष्ट्रवादीने भाजपला ललकारले !

NCP News : मोदी सरकारने २०२४ च्या निवडणुकीत ईव्हीएमवर बंदी घालावी अशी मागणी करतानाच ईव्हीएम मशीनबाबत नागरिक आणि राजकीय पक्षांच्या मनात संशय आहे. कागदी (बॅलेट) मतपत्रिकेला परवानगी दिल्यास भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही याची भीती भाजपला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केली आहे.

बांग्लादेशने अलीकडेच ईव्हीएमच्या वापरावर बंदी घातली आहे आणि कागदी (बॅलेट) पेपरचा वापर करून सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली. जगातील अनेक विकसित देशांनी ईव्हीएमच्या सत्यतेवर शंका घेऊन वापरावर बंदी घातली आहे, याकडेही तपासे यांनी लक्ष वेधले. भारतातल्या अनेक राजकीय पक्षांना तसेच वेगवेगळ्या स्वयंसेवी संघटनांना ईव्हीएम मशीनबाबत संशय आहे. त्याबाबतची चिंता अनेक वेळा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, मोदी सरकारने या चिंतेचे अद्याप निराकरण केलेले नाही.

Sharad Pawar यांच्या अदानींबद्दलच्या भूमिकेवर संजय राऊत म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ईव्हीएमच्या वापराबाबत संबंधित समस्यांबाबत प्रमुख विरोधी पक्षांची बैठक मागील काही दिवसांपूर्वी बोलावली होती. जर भाजपला २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा एवढा विश्वास असेल तर त्यांनी सर्व शंका दूर करून बॅलेट पेपरचा वापर करून मतदानाला सामोरे जावे असे आव्हान महेश तपासे यांनी दिले आहे.

बॅलेट मतपत्रिकेवर मतदान झाल्यास कदाचित १५० चा आकडा पार करता येणार की नाही याचीच भीती भाजपला आहे असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.

बंटी पाटील अन् महाडिकांमध्ये पुन्हा रंगणार कुस्ती; धोबीपछाड कोण देणार याची उत्सुकता

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या टीकेवर भाजपने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. तसे पाहिले तर ईव्हीएम मशीनचा मुद्दा देशभरात चर्चेत असतो. या मशीनमध्ये हेराफेरी करून भाजप सत्तेत येत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. मात्र, मशीन हॅक करण्याचे चॅलेंज स्वीकारून भाजपला तसे दाखवून देण्याचे चॅलेंज अजून कुणीही स्वीकारलेले नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube