‘अजितदादाच काय उद्या शरद पवारही भाजपमध्ये आले तर’.. मुनगंटीवारांचे मोठे विधान

‘अजितदादाच काय उद्या शरद पवारही भाजपमध्ये आले तर’.. मुनगंटीवारांचे मोठे विधान

Sudhir Mungantiwar : राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय नेत्यांच्या पक्ष प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांच्या भाजपबरोबर जाण्याच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या होत्या. भाजप नेत्यांकडूनही वारंवार या चर्चांना हवा दिली जात आहे. आता तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) भाजप प्रवेशाची स्वप्ने रंगवून त्यावर भाजप नेते प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

राज्य सरकारमधील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, उद्या शरद पवारही भाजपमध्ये आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे ते म्हणाले.

भावा-बहिणीच पुन्हा बिनसलं…पंकजा मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा

ते पुढे म्हणाले, अजित पवार यांची त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर काय चर्चा झाली ते मला माहिती नाही. ते अजित पवारच सांगू शकतात. भाजप एका कुटुंबापुरता मर्यादीत पक्ष नाही. त्यामुळे अजित पवार आमच्यासोबत आले तर स्वागत करणार का हा प्रश्न असेल तर मी म्हणेन की उद्या शरद पवारही भाजपमध्ये आले, ते येणार नाहीत पण, ते भाजपला पाठिंबा द्यायला तयार झाले किंवी उद्या जयंत पाटील भाजपमध्ये येणार असतील आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे मुनगंटीवार म्हणाले.

अजितदादांचे स्वागतच करू 

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपबरोबर जाणार असल्याच्या उठलेल्या वावड्या अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही थांबलेल्या नाहीत. अजूनही या चर्चा सुरूच आहेत. राज्य सरकारचे मंत्री दीपक केसरकर यांनीही दोन दिवसांपूर्वी थेट यावर प्रतिक्रिया दिल होती. अजितदादांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चा पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नीरा उजव्या कालव्याची सुटणार सलग दोन आवर्तनं

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना आज पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना केसरकर म्हणाले, ‘अजित पवार यांच्यासारखा चांगला नेता जर युतीत येत असेल तर त्यांचं स्वागतच होईल. आम्ही त्यांचे स्वागत का करणार नाही ?, असे तुम्हाला वाटते. या संदर्भात आम्हाला काहीच अस्वस्थ वाटत नाही.’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube