नितेश राणेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी…
Nitesh Rane Criticized Aditya Thackeray : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजारी असताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते, असे राणे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी जसलोक रुग्णालयाच्या खोलीत बैठका घेतल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले.
आ. राणे आज रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते. त्यासाठी जसलोकच्या खोलीत बैठका झाल्या. कोणत्या खोलीत बैठका झाल्या हे मला माहिती आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही मी देऊ शकतो, असे राणे म्हणाले.
रिफायनरीसाठी लोकांचे टाळके फोडणे योग्य नाही… पटोलेंची सत्ताधाऱ्यांवर टीका
वडील आजारी असताना आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आण त्यांच्या टोळीला घेऊन दावोस येथे गेले होते, असे राणे यांनी सांगितले. राणे यांच्या या वक्तव्यावर अद्याप आदित्य ठाकरे किंवा ठाकरे गटातील अन्य कुण्या नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, राणेंच्या या दाव्यावर ठाकरे गटाकडूनही आक्रमक प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राणे यांनी खासदार संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. 70 टक्के लोक रिफायनरीच्या विरोधात आहेत असं सांगायला तुम्ही काय सर्व्हे केला होता का ?, सरकारने सर्व्हे केला नव्हता, तर प्रकल्पाच्या विरोधात लोक आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही तरी एखादा सर्व्हे केला होता काय ?, असा सवाल राणे यांनी केला.