विधानपरिषदेसाठी एक नाव फिक्स; शिंदेसेनेत दुसऱ्या जागेसाठी चुरस…

Shivsena-विधानपरिषदेत निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. शिवसेनेचे संख्याबळ 57 असल्यामुळे दुसरी जागाही निवडून आणणं सोपं आहे.

  • Written By: Published:
Ekanth Shinde

Maharashtra Legislative Council Election-राज्यसभा निवडणुकीत ऐनवेळी ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत सामान्य शिवसैनिकाला (Shivsena) संधी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी धक्कातंत्र वापरले होते.आता आगामी विधानपरिषद निवडणुकीत देखील त्याच पद्धतीचा वापर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केलीय. विधानपरिषदेसाठी एक नाव फिक्स झाले आहे. दुसऱ्या नावासाठी मात्र जोरदार चुरस आहे.

निवडणुकीची घोषणा होताच शिवसेना शिंदे गटात हालचालींना वेग आला असून उमेदवारीसाठी इच्छुकांची चढाओढ सुरू झाली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी मिळणार आहे. त्यांच्या नावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषद फिक्स मानली जात आहे. तर दुसऱ्या जागेसाठी पक्षात मोठी स्पर्धा निर्माण झालीय. या जागेसाठी अभिजित अडसूळ, कोल्हापूरचे माजी खासदार संजय मंडलिक हे इच्छुक आहेत. त्याचबरोबर रवींद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दीपक सावंत यांच्यासह अनेक नेत्यांनी दावेदारी केलीय. संजय मंडलिक आणि शायना एनसी हे राज्यसभेसाठी इच्छुक होते. परंतु ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवत शिंदेंना सर्वांनाच धक्का दिलाय.

विधानपरिषदेत निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ 57 असल्यामुळे दुसरी जागाही निवडून आणणं सोपं आहे. या जागेसाठी अनुभवी नेत्यांवर विश्वास दाखवलं जाईल की राज्यसभेप्रमाणे एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपमध्ये जोरदार चुरस
दुसरीकडे मात्र भाजपमध्ये विधानपरिषदेसाठी जोरदार चुरस दिसून येत आहे. माजी आमदार राम सातपुते, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, केशव उपाध्ये, माधवी नाईक यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. तसेच पुण्याचे माजी आमदार जगदीश मुळीक हेही भाजपकडून इच्छुक आहेत. जगदीश मुळीक भाजपचे शहराध्यक्ष राहिलेले आहे. तसेच 2014 ला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून विजयी झालेले आहेत. 2024 ला ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्याने जगदीश मुळीक यांना माघार घ्यावी लागली होती.कोपरगावचे विवेक कोल्हेही भाजपकडून इच्छुक आहे. त्यांना विधानसभेच्या वेळी राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द भाजपकडून मिळाला होता. परंतु राज्यसभेवर संधी मिळाली नाही. आता ते विधानपरिषदेसाठी इच्छुक आहेत. तसेच राहुरीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरेही भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळेते ही विधानपरिषदेसाठी इच्छुक असणार आहेत.

follow us