नऊ वर्षांचा ‘भुलभूलैय्या’, जनतेला फक्त ‘कळा’च, 2024 मध्ये सफाया; ठाकरे गटाचा घणाघात

नऊ वर्षांचा ‘भुलभूलैय्या’, जनतेला फक्त ‘कळा’च, 2024 मध्ये सफाया; ठाकरे गटाचा घणाघात

Uddhav Thackeray : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची (India Alliance) वज्रमूठ 2024 मध्ये आपला सफाया करणार याची जाणीव झालेले राज्यकर्ते आणि त्यांचे भक्त यांना इंडिया नव्हे भारत (Bharat) ची उचकी लागली आहे. चांद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहिमेपासून जी 20 परिषदेपर्यंत (G20 Summit) तथाकथित जागतिक यशाचा क्लोरोफॉर्म जनतेला देण्याचे उद्योग होत आहेत. हूल आणि भूल ही सध्याच्या राज्यकर्त्यांची प्रमुख शस्त्रे आहेत. त्यांचा वापर करीत जनतेला एका वेगळ्याच भुलभूलैय्यात ठेवण्याचा उद्योग नऊ वर्षांपासून सुरू आहे. 2024 साठीही त्यांचा तोच प्रयत्न आहे. मात्र या नऊ वर्षांच्या सत्तेने आपल्याला फक्त कळाच दिल्या, हे आता जनतेला समजले आहे. त्यामुळे 2024 मध्ये देशात परिवर्तन घडवून आणायचेच असा निश्चय जनतेने मनाशी केल्याचे स्पष्ट करत केंद्रातील मोदी सरकारवर उद्धव ठाकरे गटाने सामनातून पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

दिल्लीश्वरांचं लादलेलं संकट कायमचं दूर कर

आज राज्यात घरोघरी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवशीच ठाकरे गटाने शिंदे सरकारवर (Eknath Shinde ) टीका करत दिल्लीश्वरांनी महाराष्ट्राच्या माथी मारलेले संकट कायमचे दूर कर असे साकडे बाप्पाला घातले आहे. ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आताच्या सरकारवर सामनाच्या अग्रलेखातून घणाघाती टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात सुमारे 50 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली. एकीकडे दुष्काळ, नापिकी, त्यातून उद्भवलेला कर्जतबाजारीपणा, त्यामुळे वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुसरीकडे मिंधे राज्यकर्त्यांच्या फसव्या घोषणा हे राज्यावरील गंभीर संकटच आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

घोटाळ्याच्या आरोपानंतरच अजितदादा सत्तेत; विरोधकांच्या आरोपांवर सुधीर मुनगंटीवारांचं उत्तर

दिल्लीश्वरांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राच्या माथी लादलेले हे संकट कायमचे दूर कर, अशीच प्रार्थना राज्यातील जनता श्रीचरणी करत आहे. केंद्रातील स्वयंघोषित राज्यकर्त्यांबाबतही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. महागाईपासून बेरोजगारीपर्यंत, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यापासून रोजगार निर्मितीपर्यंत, धर्मापासून विकासापर्यंत, देशाच्या संरक्षणापासून तथाकथित आत्मनिर्भरतेपर्यंत फक्त डंका आणि बोभाट्याचे फुगे हवेत सोडले जात आहेत. त्यातून दंगली पेटवून त्यावर राजकीय स्वार्थाच्या पोळ्या भाजण्याचे सत्तापक्षाचे इरादे आहेत, अशी टीका ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) केली आहे.

 

‘इतकं क्रूर सरकार अन् राजकारण आम्ही पाहिलं नाही’; मणिपूरवरून राऊतांची पुन्हा आगपाखड

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube