मी उत्तर देऊ शकत नाही माझी ती घमेंड जिरली; पंच्याहत्तरीच्या भाषणात नारायण राणे असं का म्हटले?
Narayan Rane सर्वांनी नारायण राणेंबद्दल भाषणामध्ये केलेल्या कौतुकावर नारायण राणे यांनी एक प्रांजल कबुली देखील दिली.
Narayan Rane on his 75 Birthday in Sindhudurg : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांचा 74 वा वाढदिवस शुक्रवारी सिंधुदुर्गमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. या सर्वांनी नारायण राणेंबद्दल भाषणामध्ये केलेल्या कौतुकावर नारायण राणे यांनी एक प्रांजल कबुली देखील दिली. राणे म्हटलं की, मी उत्तर देऊ शकत नाही, माझी ती घमेंड जिरली. मात्र नारायण राणे असं का म्हणाले?
पंच्याहत्तरीच्या भाषणात नारायण राणे असं का म्हटले?
आपल्या पंच्याहत्तरीमध्ये पदार्पण करण्याच्या भाषणामध्ये बोलताना राणे म्हणाले की, मी माझ्या आयुष्यामध्ये बरीच भाषणं केली, बऱ्याच प्रश्नांना उत्तर दिली. या देशातील बहुतांश सभागृहांमध्ये मी भाषण केली, कामकाज केलं. पण आज जो दिवस आहे. हा माझ्यासाठी वेगळा आहे. वेगळा यासाठी आहे की, अनेक वेळा सभागृहात किंवा बाहेर होणाऱ्या माझ्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांना उत्तर देण्याचं काम मी त्या-त्यावेळी केलं.
मोठी बातमी! परभणीसह वाशिम, नांदेड, हिंगोलीच्या विविध भागांत भूकंपाचे सौम्य धक्के…
मात्र आज या सर्व नेत्यांनी, सहकाऱ्यांनी भाषणामध्ये माझं कौतुक केलं, माझ्या कामाचा गौरव केला. हे सर्व ऐकल्यानंतर मला वाटतंय की, या सर्वांच्या भाषणाला मी उत्तर देऊ शकत नाही. अशी माझी परिस्थिती झाली आहे. मी नेहमी दोन गोष्टी म्हणतो की, कोणी काहीही विचारा, काहीही बोला मी समर्थ उत्तर देईन. मात्र आज ही माझी घमेंड जिरली. मी म्हणतो की, मी कोणाला घाबरत नाही. तसेच मी निरूत्तर होणार नाही असं देखील म्हणतो. मात्र आज ही देखील माझी घमेंट जिरली असच म्हणेल. असं म्हणत आपल्या 74 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या भाषणामध्ये नारायण राणेंनी प्रांजळ कबुली दिली.