‘दाढी-मिशी नसणारे सुद्धा आमदार होतात’ म्हणणाऱ्या बच्चू कडूंना नितेश राणेंचा सल्ला; ‘कडू बोलणं..,’
Nitesh Rane on Bachchu Kadu : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू असताना आता पुन्हा एकदा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यात वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, आता बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी ज्याच्या बोलण्यात दम नसतो, ओठावर मिशी नसते, चालतो तेव्हा बाई आहे की माणूस ते सुद्धा कळत नाही, असेही लोक आमदार होतात. हिजडेसुद्धा आमदार होतात, असं वादग्रस्त वक्तव्य केलं. यावर आता आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) भाष्य केलं.
आमदार नितेश राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या विधानाविषयी विचारले असता ते म्हणाले, बच्चू कडू यांना एवढंच मला सांगायचं की पत्रकारांशी बोलण्यापेक्षा खिशात ठेवलेला फोन काढा, आणि राज्याच्या मुख्य नेत्यांशी बोला आणि जरा कडू बोलणं सोडून द्या, असं राणे म्हणाले.
‘लुटमार, गद्दारीचे दिवस जाणार अन् पुन्हा..,’; Aaditya Thackeray यांचा राज्य सरकारवर निशाणा
आज गणेशोत्सवानिमित्त कोकणात ट्रेन सोडण्यात आल्या. याविषयी राणे म्हणाले की, यापुर्वी आम्ही ६ ट्रेन सोडल्या आहेत. आम्ही २५० बसेस सोडत आहोत. गणपतीच्या काळात आम्ही या सेवा कोकण वासियांना देतो. नाना पटोले, उध्दव ठाकरे यांची कधी ही गाड्या सोडल्या नाहीत, असं राणे म्हणाले.
यावेळी राणेंनी आदित्य ठाकरेंवरही टीका केली. ते म्हणाले, आदित्य ठाकरेंनी टीका करू नये. पण हिम्मत असेल तर फक्त ८ रेल्वे गाड्या कोकणवासीयांसाठी सोडून दाखवाव्या, असं आव्हान केलं.
लवकरच संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. मात्र, सरकारने अधिवेशनाचा अजेंडा जाहीर केला नसल्याने अधिवेशनावर टीका करत होते. यावरही राणेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहेत. त्यात कोणत्या पॉलीसी तयार केल्या जातील हे पहावं लागेल, पण जे काही नवे कायदे होतील ते देशहितासाठी होतील. शिवसेना उबाठा गटाने आपला विरोध करत रहावा, असा खोचक टोला लगावला.