कॉपीबहाद्दरांना मोदी असं काय म्हणाले ? शिंदे, फडणवीसांना हसू आवरेना !

कॉपीबहाद्दरांना मोदी असं काय म्हणाले ? शिंदे, फडणवीसांना हसू आवरेना !

दिल्ली : ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विद्यार्थ्यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना विरोधकांची शाळा घेतली. विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम आज पार पडला. दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियमवर झालेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी, पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी पंतप्रधान मोदी यांना काही राजकीय प्रश्नही विचारण्यात आले. यावर त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तरं दिली.

देशभरातून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान मोदींनी सखोल उत्तरे दिली. यावेळी कॉपीच्या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी विनोदी पद्धतीने उत्तर दिले, ज्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना हसू आवरले नाही. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये परिक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. मात्र यावेळी २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाची चर्चा व्हावी, म्हणून यावर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कॉपीबहाद्दरांना म्हणजेच कॉपी करण्यात काही विद्यार्थी खूपच हुशारी दाखवतात. तेवढ्या वेळात अभ्यास होऊ शकतो, तेवढा वेळ ते कॉपी करण्याचे मार्ग शोधत राहतात. अतिशय लहान लहान अक्षरात नोट बनवत असतात. पर्यवेक्षकाला कसं फसवलं जाईल ? हे ते अभिमानाने इतरांना सांगत असतात. आजकाल मूल्यांमध्ये बदल झाल्याने कॉपी करण्यात कुणाला गैर प्रकार वाटत नाही. पण कॉपी करुन तुम्ही एक परीक्षा पास व्हाल, पण आयुष्याच्या परीक्षेत तुम्ही काय करणार ? आजच्या युगात प्रत्येक क्षणाक्षणाला परिक्षा द्यावी लागत असते. यामुळे कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिकपणे मेहनत करत रहा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube