Maharashtra Politics : प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांबाबत वक्तव्य, राष्ट्रवादीने स्पष्ट शब्दांत सुनावलं

Maharashtra Politics : प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांबाबत वक्तव्य, राष्ट्रवादीने स्पष्ट शब्दांत सुनावलं

मुंबई : शरद पवार हे आज देखील भाजपाबरोबर आहेत असा गौप्यस्फोट करुन प्रकाश आंबेडकरांनी ( Prakash Ambedkar) राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ( Maharashtra Politics ) यावर राष्ट्रवादीकडून आंबेडकरांवर टीकेची झोड उठवली जात असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंबेडकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केलं. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये पूर्वीपासूनच ठरलं आहे. जेवढे मित्रपक्ष येतील तेवढे जमा करून मविआची ताकद वाढवायची. उद्या राष्ट्रवादी देखील काही नवीन मित्र जोडू शकतो. मात्र या पक्षांनी ऐनवेळी आपली भूमिका बदलू नये, असं केल्यास मतदारांचा गोंधळ होतो असं जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  हे काल, आज आणि उद्या भाजपचेच असल्याचं वक्तव्य करुन वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी खळबळ उडवून दिल्यानं राष्ट्रवादीमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. महाविकास आघाडीतल्या घटकपक्षांच्या मित्रपक्षांनी घटकपक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांवर बोलताना सांभाळून बोलावं, असा इशाराच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

इतकंच नाही..तर तिकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंनाच (Uddhav Thackeray) अल्टिमेटम दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत ठोस भूमिका ठरवून घटकपक्षांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. वंचित आघाडीने शिवसेनेशी युती केलेल्या चौथ्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी सुरु झाल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही महाविकास आघाडीचा भाग व्हायचा असेल तर शरद पवारांबद्दल आदर ठेवून बोललं पाहिजे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.

ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची अधिकृत घोषणा ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी उध्दव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली होती. यावेळी आंबेडकरांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यातील वादाचा मुद्दा देखील उपस्थित केला होता. मात्र, महाविकास आघाडीत आंबेडकरांना सहभागी करुन घेण्यास कुणाची ना नाही असं विधान ठाकरेंनी केलं होतं.

तसेच यावेळी त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांची मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं असा गौप्यस्फोट करत आंबेडकरांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube